गोवा विद्यापीठात हवे भाऊसाहेबांचे अध्यासन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

गोवा विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन असण्याची गरज आहे व त्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना करणार असल्याची ग्वाही दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर यांनी दिली. 
 

पणजी (गोवा) : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंदर ऊर्फ भाऊसाहेब बांदडोकर यांचे गोव्याच्या विकासातील योगदान बुहमोलाचे आहे. त्यांनी राजकारण, समाजकारण व सहकार चळवळ उभी करत चौफेर असे कार्य केले. त्यामुळेच गोवा विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन असण्याची गरज आहे व त्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना करणार असल्याची ग्वाही दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर यांनी दिली. 

पणजी येथील गोमंतक मराठा समाजातर्फे स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या आजच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात खासदार सावईकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बांदोडकर यांनी गोवा मुक्त झाल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर जे कार्य केले ते आजच्या पिढीला माहीत नाही त्यामुळे ही माहिती शालेय ते उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याची जयराम रेडकर यांनी केलेली मागणीशी मी सुद्ध सहमत आहे व त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

या कार्यक्रमावेळी गोवा कला महाविद्यालय मर्यादित स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या विषयावर चित्रकला स्पर्धा तसेच अखिल गोवा माध्यमिक विद्यालय शिक्षक मर्यादित वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. विजेत्यांना प्रमुख पाहुणे सावईकर व व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhausahebs teachings are needed at Goa University