गोवा - मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भावना नानोस्कर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मुरगाव : वास्को गोवा येथील मुरगाव नगरपालिकेच्या ४९व्या नगराध्यक्ष म्हणून मगो पक्षाच्या भावना नानोस्कर ह्या निवडून आल्या. त्यांनी फेड्रिक हेन्रीक ‌यांचा १३ विरुद्ध १२असा एकमेव मताने पराभव केला.

नगराध्यक्ष निवडणुकीत आपल्याच गटातील उमेदवार निवडून यावा यासाठी भाजपाच्या दोन आमदारांमध्ये चढाओढ लागली होती.यात मुरगावचे आमदार मिलिंद नाईक वरचढ ठरले,तर वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा कमनशिबी ठरले.शेवटच्या क्षणी कॉंग्रेस चे मुरगाव मधील गटाध्यक्ष असलेले बायणा येथील नगरसेवक मुरारी बांदेकर यांनी आमदार मिलिंद नाईक गटाला साथसंगत केल्याने आमदार कार्लूस आल्मेदा गटाची पालिकेतील सत्ता गेली.

Web Title: bhavana nanoskar elected as a chief of murgao corporation goa