भारतात 'भीम' ऍप बनले 'नंबर वन!'

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झालेले 'भीम' ऍप हे काही तासांतच भारतात 'नंबर वन'चे ऍप बनले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या ऍपचे मोदींच्या हस्ते 30 डिसेंबर शुभारंभ झाला आहे. (‘भारत इंटरफेस फॉर मनी’ असे या ऍपचे खरे नाव.) काही वेळातच ते नागरिकांच्या पसंतीचे ऍप ठरले असून, क्रमांक एकवर पोहचले आहे. अंगठ्याच्या सहाय्याने पेमेंट करता येण्याच्या या ऍपला नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे.

गुगल प्ले स्टोअरवर इतक्या कमी वेळात सर्वाधिक डाउनलोड होणारे हे पहिले भारतीय ऍप ठरले आहे. या ऍपला 86000 हून अधिक रिव्ह्यू मिळाले असून, या ऍपची रेटिंग ही 4.1 एवढी आहे. सध्या हे ऍप केवळ अॅंड्रॉइड मोबाईलवर उपलब्ध आहे. पुढील काही दिवसांमध्ये हे ऍपलवर उपलब्ध होणार आहे. दरम्यान, देशातील संपूर्ण व्यवहार या ऍपवरून होण्याचा दावा मोदींनी केल्याने पेटीएम, मोबीक्विक, फ्रीचार्ज, एसबीआयबीडी यासारख्या खासगी ‘ई-वॉलेट’ना या ऍपमुळे मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: BHIM becomes most popular Android app in India