भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाला नवं वळण; अमेरिकन फर्मनं केला खळबळजनक दावा! Bhima Koregaon Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhima Koregaon Case Father Stan Swamy

देशातील प्रसिद्ध भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

Bhima Koregaon Case : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाला नवं वळण; अमेरिकन फर्मनं केला खळबळजनक दावा!

Bhima Koregaon Case : देशातील प्रसिद्ध भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आलीय. एका अमेरिकन फॉरेन्सिक फर्मनं (American Forensic Firm) दावा केलाय की, 'फादर स्टेन स्वामी (Stan Swamy) यांचा संगणक हॅकरनं हॅक केला होता आणि त्यावर आक्षेपार्ह कागदपत्रं मुद्दाम पेरण्यात आली होती.'

सुनियोजित षडयंत्राखाली स्वामींना गोवण्यात आलं आणि त्यांच्या संगणकाच्या हार्ड ड्राइव्हमध्ये बनावट कागदपत्रं टाकण्यात आली होती. 5 जुलै 2021 रोजी 84 वर्षीय स्वामी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांना वैद्यकीय कारणास्तव तात्पुरत्या जामिनावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, असं अमेरिकन फर्मनं म्हटलंय.

हेही वाचा: Prashant Kishor : 'दहावी नापास झालेल्या नेत्यांची मुलं मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहताहेत'

स्टेन स्वामींना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटक

कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी यांना भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. दरम्यान, स्वामींचा मृत्यू झाला, त्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. स्वामींबद्दलचा हा खुलासा आर्सेनल कन्सल्टिंग या मॅसॅच्युसेट्सस्थित डिजिटल फॉरेन्सिक फर्मनं केला आहे. असं 'द वॉशिंग्टन पोस्ट'मध्ये फर्मच्या वतीनं सांगण्यात आलंय.

हेही वाचा: India-China Clashed : चीनविरोधात अमेरिकेची आक्रमक भूमिका; म्हणालं, भारताच्या सुरक्षेसाठी आम्ही..

स्वामींचे माओवाद्यांसोबत जवळचे संबंध?

वृत्तानुसार, मानवाधिकार कार्यकर्ते रोना विल्सन आणि सुरेंद्र गाडलिंग यांना डिजिटल पुराव्याच्या आधारे ज्या प्रकारे अटक करण्यात आली, त्याच पद्धतीनं स्वामी यांना देखील अटक करण्यात आली होती. स्वामींच्या संगणकावर 50 हून अधिक बनावट अंकाउंट (प्रती) तयार करण्यात आली होती. त्यामध्ये स्वामींचे आणि माओवादी गटाचे जवळचे संबंध असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. मात्र, हे पूर्णपणे चुकीचं होतं. या सर्व बनावट प्रती 5 जून 2019 रोजी म्हणजेच, स्वामी यांना अटक होण्याच्या एक आठवडा आधी अपलोड करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

फादर स्टेन स्वामी कोण होते?

कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी हे भारतातील सर्वात वृद्ध व्यक्ती होते, त्यांच्यावर दहशतवादाचा आरोप होता. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या संदर्भात त्यांना जानेवारी 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांना NIA नं अटक करुन स्वामींवर अनेक गंभीर कलमे लावण्यात आली होती. 26 एप्रिल 1937 रोजी त्रिची, तामिळनाडू इथं जन्मलेल्या स्वामींनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात झारखंडमधील आदिवासींसाठी खूप काम केलं. झारखंड सरकारच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. पाथलगढी आंदोलनामुळं त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल झाला होता. 1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव इथं दलित समाजाच्या कार्यक्रमात हिंसाचार झाला होता. एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप झाल्यानंतर स्वामी यांना अटक करण्यात आली होती.