Lok Sabha Election 2024 : भिवंडीत ‘तुतारी’ला सूर गवसेना; मित्रपक्षाच्या ‘हाता’ने वाढवली डोकेदुखी

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदार संघात महायुतीचे विद्यमान खासदार कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळया मामा म्हात्रे यांच्यात प्रमुख लढत होणार होती
Bhiwandi Lok Sabha Election Shard Pawar NCP VS Congress BJP Politics Kapil Patil VS Suresg Mhatre
Bhiwandi Lok Sabha Election Shard Pawar NCP VS Congress BJP Politics Kapil Patil VS Suresg Mhatre

ठाणे : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मोठया हट्टाने राष्ट्रवादी शरद पवार गटाने भिवंडी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला. पण उमेदवारी अर्ज भरण्याची घटीका समिप आली तरी भिवंडीत ‘तुतारी’ला सूर गवसत नसल्याचे चित्र दिसत आहे. आपला पारंपारिक गड सोडण्यास काँग्रेस अजूनही तयार नाही. या मतदारसंघावर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपला दावा न सोडता इच्छुक उमदेवारांनी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बंडाचा झेंडा फडकणार असल्याची चिन्ह असून ‘तुतारी’साठी ‘हाता’मुळे डोकेदुखी वाढणार आहे.  

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदार संघात महायुतीचे विद्यमान खासदार कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळया मामा म्हात्रे यांच्यात प्रमुख लढत होणार होती. मात्र जिजाउ संघटेनेचे निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी जाहिर केल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. महायुतीत अंतर्गत धुसफूस तर महाविकास आघाडीत मित्रपक्षाचा असहकार यामुळे दोन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक मोठी जिकरीची झाली आहे. 

पण खरे आव्हान आहे ते महाविकास आघाडीच्या बाळ्या मामांसमोर. भिवंडी हा काँग्रेसचा गड असून गेले दोन निवडणुका सोडल्यातर येथून हाताच्या चिन्हावर खासदार निवडून येत होते. भिवंडी लोकसभा मतदार संघात २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश टावरे हे निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. परंतु, या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती. पारंपारिक मतदारसंघ असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

Bhiwandi Lok Sabha Election Shard Pawar NCP VS Congress BJP Politics Kapil Patil VS Suresg Mhatre
Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

प्रचारापेक्षा मनधरणीत अधिकवेळ खर्ची

भिवंडी लोकसभेत मित्र पक्षांच्या नारजी नाट्यामुळे प्रचारापेक्षा मनधरणी करण्यातच महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा वेळ आणि शक्ती खर्च होत असताना दिसते. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात बाळया मामा यांनी काँग्रेस कार्यालय गाठण्याचा प्रयत्न केला. खूप मेहनतीने त्यांना शहर कार्यालयाचे दरवाजे उघडे झाले आहेत. पण ग्रामीण भागात काँग्रेसने हात झटकल्याचे दिसते. अद्यापही ग्रामीणचे काँग्रेस पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तर, नाराज उद्धव ठाकरे गटातील देखील एक नेत्यांनी मन राखण्यात यश आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Bhiwandi Lok Sabha Election Shard Pawar NCP VS Congress BJP Politics Kapil Patil VS Suresg Mhatre
Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

मोठा फटका बसण्याची शक्यता

काँग्रेसची नाराजी दूर करण्यात बाळया मामा यांना अद्यापी यश आल्याचे दिसून येत नाही. नाराजीमुळेच ते अद्याप प्रचारात उतरलेले नाहीत दुसरीकडे निवडणूक अर्ज घेण्याच्या पहिल्याच दिवशी भिवंडीतून तब्बल २५ उमेदवारांनी ५४ नामनिर्देशन अर्ज घेतले. यामध्ये काँग्रेसच्या इच्छूक उमेदवाराने सात अर्ज घेतले आहेत. त्यामुळे येथून बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. 

पक्षाने साथ दिली नाही तर काँग्रेसचे काही पदाधिकारी अपक्ष निवडणूक लढण्यासही तयार असल्याची माहिती मिळते. भिवंडी मतदारसंघ हा मुस्लीम बहूल असल्याने या समाजाची एक गठ्ठा मते फुटणार आहेत. त्यात अपक्ष उमेदवार निलेश सांबरे असून त्यांची सामाजिक ताकद मोठी आहे. या परिस्थितीत हाताची साथ न मिळाल्यास  महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com