Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

याच जागेवरुन महाविकास आघाडीनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
senior lawyer ujjwal nikam reaction on supreme court verdict shivsena dispute and 16 mla disqualification
senior lawyer ujjwal nikam reaction on supreme court verdict shivsena dispute and 16 mla disqualificationsakal

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपनं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं या जागेवरुन विद्यमान खासदार असलेल्या पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. तर दुसरीकडं याच जागेवरुन महाविकास आघाडीनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं आता निकम विरुद्ध गायकवाड यांच्यामध्ये इथं लढत होणार आहे. (Ujjwal Nikam has been announced as a candidate from Mumbai North Central by BJP)

26/11 मुंबई हल्ल्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं होतं. यामधील एकमेव जिवंत हाती आलेला दहशतवादी अजमल कसाब याला फाशीपर्यंत पोहोचवण्यात त्यांची मोठी भूमिका होती. अॅड. निकम यांनी तत्पूर्वी अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला ते चांगले परिचित आहेत. देशातील एक निष्णांत वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची ख्याती आहे.

senior lawyer ujjwal nikam reaction on supreme court verdict shivsena dispute and 16 mla disqualification
Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

दरम्यान, मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून पूनम महाजन या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. त्यांचा पत्ता मात्र भाजपनं यावेळी कापला आहे. त्यांच्याविरोधात मतदारसंघात नाराजी असल्यानं त्यांचा पत्ता कट होईल अशी चर्चा होती. पण त्यानंतर या जागेवरुन मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना उमेदवारी जाहीर होण्याची चर्चा सुरु होती. पण अखेर भाजपनं उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Latest Marathi News)

senior lawyer ujjwal nikam reaction on supreme court verdict shivsena dispute and 16 mla disqualification
Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

कालच महाविकास आघाडीकडून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना राजकारणाचा चांगला अनुभव असल्यानं निकम यांच्यासमोर गायकवाड यांचं मोठं आव्हान असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com