Pragya Singh Thakur Controversy
esakal
भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. जर तुमची मुलगी परधर्मातील मुलाबरोबर पळून जात असेल, तर तिचे हातपाय तोडा, असा सल्ला त्यांनी मुलींच्या पालकांना दिला आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. त्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.