Bhopal Gas Tragedy 1984 Full Story
esakal
Bhopal Gas Tragedy 1984: वर्ष होतं १९८४....नोव्हेंबरचा महिना संपून दोनच दिवस झाले होते. हिवाळा असल्याने प्रचंड थंडीही होती. रात्री सर्वजण ब्लँकेट घेऊन गाढ झोपेत होते. रात्री झोपताना आपण सकाळचा सूर्य पाहू शकणार नाहीत, याची साधी कल्पनाही कुणी केली नव्हती. भारताच्या इतिहासातील ती रात्र एक काळ्या अध्यायासारखी होती. एका क्षणात हजारोंनी जीव गमावला. इतकच नाही तर पुढे कित्येक पिढ्यांनी ते दु:खं सहन केलं.