

bhopal Municipal Corporation protest
esakal
Bhopal Municipal Corporation protest : मध्य प्रदेशातील भोपाल नगर निगम मुख्यालयातील अटल भवन येथे सोमवारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान गोंधळाची घटना घडली. एका कर्मचाऱ्याने महापौर मालती राय यांच्या वाहनावर आगीचे कागदी गोळे फेकल्याने गाडीला अचानक आग लागली. वाहनातून आगीच्या ज्वाळा उठताच निगम परिसरात काही काळ वातावरण तणावाचे बनले. घटनेनंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी राम सिंह यादव हे कर्मचारी जखमी झाले. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.