esakal | पहिल्याच आमदारकीत मुख्यमंत्री; भूपेंद्र पटेलांनी घेतली शपथ
sakal

बोलून बातमी शोधा

Bhupendra Patel

पहिल्याच आमदारकीत मुख्यमंत्री; भूपेंद्र पटेलांनी घेतली शपथ

sakal_logo
By
सुधीर काकडे

अहमदाबाद:गुजरातमध्ये विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्याकडे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. काल भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर आज भूपेंद्र पटेल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.

विधानसभा निवडणुकीला (Assembly election) वर्षभराचा कालावधी बाकी असलेल्या गुजरातमध्ये (gujarat politics) आज नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे. गुजरातमध्ये मोठा राजकीय फेरबदल झाला आहे. भुपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी आज दुपारी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत (Acharya Devvrat) यांनी भुपेंद्र पटेल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत या शपथविधी सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा हजर आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी भुपेंद्र पटेल यांनी अहमदाबादच्या स्वामीनारायण मंदिरात 'गौ पूजा' केली.

हेही वाचा: मोदी-शहांचे निकटवर्तीय 'भुपेंद्र पटेल' नेमके आहेत तरी कोण?

गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्र तोमर यांनी या बाबतची घोषणा केली. आज भूपेंद्र पटेल यांनी शपथ घेतली असून, त्यानंतर दोन दिवसानंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पटेल यांच्या शपथविधी सोहळ्याला गृहमंत्री अमित शाह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही उपस्थित होते. गुजरात विधानसभेत एकूण १८२ पैकी ११२ आमदार भाजपचे आहे. पटेल हे २०१७ मध्ये घाटलोडिया मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी या विषयात पदविका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे ते जवळचे समर्थक मानले जातात.

loading image
go to top