भूखंड गैरव्यवहारप्रकरणी हुडा यांची सीबीआयकडून चौकशी

पीटीआय
मंगळवार, 6 जून 2017

डा मुख्यमंत्री असताना औद्योगिक क्षेत्रातील 14 भूखंड वाटपात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी सीबीआयमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे

नवी दिल्ली - पंचकुला येथील 14 औद्योगिक भूखंड गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने आज हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य चत्तरसिंग यांची चौकशी केली. हुडा मुख्यमंत्री असताना सिंग हा त्यांचा मुख्य सचिव होता. त्यामुळे या दोघांना आज सीबीआयने चौकशीसाठी मुख्यालयात बोलविले होते. हुडा मुख्यमंत्री असताना औद्योगिक क्षेत्रातील 14 भूखंड वाटपात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी सीबीआयमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, चौदा जणांना नियमाविरोधात भूखंड देण्यात आले, त्याचप्रमाणे मुदत संपल्यानंतरही त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. या चौदा जणांनी 24 जानेवारी 2012 रोजी आपले अर्ज दाखल केले होते. वास्तविक अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 6 जानेवारी 2012 ही होती, असेही या तक्रारीत म्हटले आहे. हुडा त्या वेळी मुख्यमंत्री होते त्याचप्रमाणे शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. त्याशिवाय या तक्रारीत निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डी. पी. एस. नागल, हुडा यांचे मुख्य प्रशासकीय अधिकारी एस. के. कन्सल आणि कन्ट्रोलर ऑफ फायनान्स बी. बी. तनेजा यांचीही नावे त्यात समाविष्ट आहेत. हे देण्यात आलेले 14 भूखंड 496 स्क्वेअर मीटर ते 1 हजार 280 स्क्वेअर मीटर इतके आहेत.

Web Title: Bhupendra singh Hooda questioned by CBI