VIDEO : 'जय श्रीराम'चा नारा देत मदरशात जबरदस्तीनं घुसखोरी; 4 जणांना अटक

मुस्लिमांना अपमानित करण्यासाठी भाजप अशा कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ओवैसींनी केलाय.
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisiesakal
Summary

मुस्लिमांना अपमानित करण्यासाठी भाजप अशा कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ओवैसींनी केलाय.

कर्नाटकातील बिदरमधील (Karnataka Bidar) ऐतिहासिक मस्जिद आणि मदरशात जबरदस्तीनं घुसून घोषणाबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तसंच यातील 4 जणांना अटक करण्यात आलीय. इतरांच्या शोधात छापेमारी सुरू आहे.

त्याचवेळी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी या संपूर्ण प्रकरणावर राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधलाय. मुस्लिमांना अपमानित करण्यासाठी भाजप (BJP) अशा कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. बिदरचे अतिरिक्त एसपी महेश मेघनवार यांनी सांगितलं की, बिदर पोलिसांनी (Bidar Police) या प्रकरणी 9 जणांची ओळख पटवून गुन्हा दाखल केला आहे. दसऱ्याच्या कार्यक्रमादरम्यान हे लोक महमूद गवान मदरशामध्ये घुसले होते. इथं मदरशात त्यांनी पूजाही केली. यावर मुस्लीम समाजातील लोकांनी विरोध दर्शवला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Asaduddin Owaisi
VIDEO : PM मोदींनी हेलिकॉप्टरमधून स्वत: बनवला व्हिडिओ; 18 तासांत मिळाले 32 लाख व्ह्यूज

AIMIM प्रमुख ओवैसी यांनी या संपूर्ण घटनेवरून भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. ओवैसींनी एक व्हिडिओ शेअर केला असून कर्नाटकातील बिदरमधील ऐतिहासिक महमूद गवान मस्जिद आणि मदरशाची ही दृश्यं आहेत. अतिरेक्यांनी गेटचं कुलूप तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केलाय. बिदर पोलिस आणि सीएम बसवराज बोम्मई, तुम्ही लोक हे कसं होऊ देऊ शकता?' असा थेट सवाल त्यांनी केलाय.

Asaduddin Owaisi
Akola : आठवलेंच्या 'त्या' वक्तव्याची प्रकाश आंबेडकरांनी इज्जतच काढली; म्हणाले, काही महाभाग..

मदरशात जय श्रीरामचा नारा

मुस्लिमांना अपमानित करण्यासाठी भाजप अशा कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही ओवैसींनी केलाय. महमूद गवान मस्जिद आणि मदरशात घुसलेल्या लोकांनी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्याचा दावा या प्रकरणात करण्यात आलाय. त्याचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आले आहेत. या संपूर्ण घटनेवर मुस्लिम संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून, याविरोधात आंदोलन करणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com