Union Budget 2023 : स्त्रीवर्गासाठी अर्थमंत्र्यांचं खास 'वाण'; पुढील दोन वर्षांसाठी मिळणार...

Union Budget 2023
Union Budget 2023esakal

नवी दिल्ली - स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशातील महिलांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे. महिलांसाठी स्वांतत्र्यांच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधून पुढील दोन वर्षांसाठी महिला सन्मान बचतपत्र योजना आणली आहे. मार्च २०२५ पर्यंत ही योजना असणार आहे. ( Union Budget 2023 news in Marathi)

Union Budget 2023
Budget 2023 : अर्थसंकल्पात युवकांसाठी नवीन काय ? शिक्षण आणि रोजगाराला प्रोत्साहन

या योजनेअंतर्गत महिला किंवा मुलीच्या नावे २ लाख रुपये पॉझिट करता येणार आहे. दोन वर्षांच्या काळात या योजनेुळे महिलांना ७.५ टक्के व्याजदर मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी डिपॉझिट मर्यादा १५ लाखांहून ३० लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच महिन्याला उत्पन्न डिपॉझिट मर्यादा ४.५ लाखांहून ९ लाख करण्यात आली आहे. तर जॉइंट अकाऊंटसाठी ९ लाखांहून १५ लाखांची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

देशातील ७१ कोटी महिलांसाठी सरकार काय नवीन घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या चार वर्षांपासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात दानलक्ष्मी (बियाणे वितरक) सारखे कार्यक्रम राबवले आणि सक्षम अंगणवाडी, पोषण २.०, मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य सारख्या कार्यक्रमांची दुरुस्ती करून महिलांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला.

Union Budget 2023
Union Budget 2023: श्रीअन्न योजना आहे तरी काय? शेतकऱ्यांना मोठा फायदा

महिला सन्मान बचतपत्र योजनेची घोषणा करून अर्थमंत्र्यांनी महिलांना मोठा आधार दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, महिला सन्मान बचत पत्र योजनेनुसार महिलांना २ लाख रुपयांच्या बचतीवर ७.५ टक्के व्याज मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com