आझम खान यांना मोठा झटका; योगी सरकारला द्यावी लागणार 70 हेक्टर जमीन

azam khan
azam khan

लखनऊ- सपा खासदार मोहम्मद आजम खान यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. रामपूर एडीएम जगदंबा प्रसाद गुप्ताच्या कोर्टाने जौहर यूनिव्हर्सिटीची 70 हेक्टर जमीन उत्तर प्रदेश सरकारच्या नावाने करण्याचा आदेश दिला आहे. कोर्टाने एमडीएमला जमीनीवर कब्जा घेणे आणि राजस्व अभिलेखात यूपी सरकारच्या नावावर जमीन करण्याचा आदेश दिला आहे.  

समाजवादी पार्टीचे खासदार मोहम्मद आजम खान यांच्या अध्यक्षतेखालील जौहर ट्रस्टने उत्तर प्रदेशात 2005 पासून आतापर्यंत 70.0563 हेक्टेर जमीन खरेदी केली आहे. मुलायम सिंह यांच्या नेतृत्त्वातील सपा सरकारच्या कॅबिनेटने जौहर ट्रस्टच्या जमीन खरेदीवर स्टॅम्प ड्यूटीमध्ये सूट दिली होती. जौहर ट्रस्टने आतापर्यंत 70.0563 हेक्टर जमीन खरेदी केली, पण यावर ट्रस्टला स्टॅम्प ड्यूटीसाठी एकही रुपाया द्यावा लागला नाही. 

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ‘वंचित’चा किसान बाग आंदोलन : प्रकाश आंबेडकर

सपा सरकारच्या कार्यकाळात जो प्रस्ताव पारित करण्यात आला होता, त्यात म्हणण्यात आलं होतं की, जौहर ट्रस्टसारख्या समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्या अल्पसंख्याक, गरीब मुलांना मोफत शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन द्यायला हवं. 

भाजपाचे लघू उद्योगाचे क्षेत्रीय संयोजन आकाश सक्सेना यांनी जौहर ट्रस्टने खरेदी केलेल्या जमीनीत शासन नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार केली होती. रामपूर डीएमच्या आदेशाने एसडीएनने एका वर्षांपूर्वी जौहर ट्रस्टने खरेदी केलेल्या जमिनीची चौकशी केली. त्यात कळालं की जौहर यूनिव्हर्सिटीसाठी खरेदी करण्यात आलेल्या  75.0563 जमिनीच्या व्यवहारात शासन नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर एडीएम कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. 

आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पोलीसांनी बेळगावात अडवले

दरम्यान, समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आजम खान यांच्यावर झालेल्या कारवाईवरुन भाजपवर टीका केली आहे. भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना जाणूनबुजून त्रास देत आहे. आजम खान यांना खोट्या आरोपात फसवलं जात आहे, असं ते म्हणाले आहेत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com