esakal | IAF साठी मोठा दिवस, बराक-८ चीन-पाकिस्तानला हवेतच देणार जोरदार प्रत्युत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

बराक-८ सिस्टिम

IAF साठी मोठा दिवस, बराक-८ चीन-पाकिस्तानला हवेतच देणार जोरदार प्रत्युत्तर

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: इंडियन एअर फोर्ससाठी आजचा दिवस मोठा आहे. आज जैसलमेरमध्ये IAF च्या ताफ्यात MRSAM/ बराक-८ मिसाइल सिस्टिमचा समावेश होणार आहे. भारत आणि इस्रायलने मिळून ही सिस्टिम विकसित केली असून यामुळे एअर फोर्सच्या युद्ध लढण्याची क्षमता वाढणार आहे तसेच शत्रुंच्या विमानांपासून स्वत:चा बचाव करता येईल.

चीन आणि पाकिस्तानचा हवाई हल्ला निष्प्रभ करण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारतातील चाचणी तळावर MRSAM/ बराक-८ मिसाइल सिस्टिमची घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली. भारतीय आणि इस्रायली कंपन्यांशिवाय इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज आणि डीआरडीओने सुद्धा ही सिस्टिम विकसित करण्यात योगदान दिले आहे.

हेही वाचा: 'त्या' महिलेचा सचिन वाजे ग्राहक होता, महिन्याला देत होता ५० हजार

MRSAM/ बराक-८ मिसाइल सिस्टिम बद्दल जाणून घ्या

ही एक मध्यम पल्ल्याची जमिनीवरुन हवेत मारा करणारी मिसाइल सिस्टिम आहे. ५० ते ७० किमीच्या रेंजमधील शत्रुचे विमान पाडण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे.

ही एक अत्याधुनिक सिस्टिम असून वेगवेगळ्या हवाई धोक्यांपासून रक्षण करु शकते.

हेही वाचा: अफगाणिस्तान संकट: अजित डोवाल यांनी रशिया समोर स्पष्ट केली भारताची भूमिका

MRSAM/ बराक-८ मिसाइल सिस्टिममध्ये अत्याधुनिक रडार, इंटरसेप्टर्स, कमांड अँड कंट्रोल आणि मोबाइल लाँचर्स आहेत.

भारतीय सैन्य दलांसाठी MRSAM सिस्टिम विकसित करण्यासाठी २०१७ साली इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज आणि भारताने १.६ अब्ज डॉलरचा करार केला होता. भारत डायनामिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो आणि इस्रायलची राफेल एडवान्स डिफेन्स सिस्टिम या कंपन्या या प्रकल्पात सहभागी आहेत.

'मेक इन इंडिया' उपक्रमातंर्गत MRSAM/ बराक-८ मिसाइल सिस्टिम विकसित करण्यात आली आहे. एअरफोर्स आणि नौदल या सिस्टिमचा वापर करेल. नौदलाच्या आवृत्तीला LRSAM म्हटले आहे. सात युद्धनौकांवर ही सिस्टिम बसवण्यात येईल.

loading image
go to top