Tribal Girls : राजस्थानच्या आदिवासी मुलींची महाराष्ट्र, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sirohi Police Mamta Gupta

'जोपर्यंत खरेदीदार मिळत नाही, तोपर्यंत टोळीचे सदस्य या अल्पवयीन मुलींचं शोषण करतात.'

Tribal Girls : राजस्थानच्या आदिवासी मुलींची महाराष्ट्र, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी

सिरोही : सिरोही पोलिसांनी (Sirohi Police) मोठी कारवाई करत आदिवासी मुलींची (Tribal Girls) मानवी तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. ही टोळी आदिवासी मुलींना फूस लावून त्यांना सोबत घेऊन जाते आणि त्यांना अंधाऱ्याकोठडीत डांबून ठेवते. त्यानंतर तिथं खरेदीदारांना बोलावून त्या मुलींची विक्री करते.

टोळीत एका आदिवासी जोडप्याचाही समावेश

जोपर्यंत खरेदीदार मिळत नाही, तोपर्यंत टोळीचे सदस्य या अल्पवयीन मुलींचं शोषण करतात. या टोळीत एका आदिवासी जोडप्याचाही समावेश आहे. सिरोहीच्या पोलीस अधीक्षक ममता गुप्ता (Mamta Gupta) यांनी सांगितलं की, आदिवासी भागातील पिंडवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासात ही बाब समोर आलीय. या प्रकरणांमध्ये पोलिसांच्या दोन विशेष पथकांनी पिंडवाडा पोलिस ठाण्यात (Pindwara Police Station) दाखल वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास केला असता, हा धक्कादायक खुलासा समोर आला. आरोपींच्या तावडीतून निसटलेल्या अल्पवयीन पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, 'ही टोळी चालवणारे बदमाश गुजरातचे (Gujarat) आहेत.'

हेही वाचा: Ghulam Nabi Azad : काँग्रेस सोडल्यानंतर आझादांची जम्मूमध्ये आज पहिलीच जाहीर सभा

अल्पवयीन मुलींवर दररोज बलात्कार

हे लोक आदिवासी भागातील निरपराध अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेतात. नंतर त्यांना अंधाऱ्याकोठडीत बंद करून ठेवलं जातं. त्यानंतर या अल्पवयीन मुलींची महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातमधील वेगवेगळ्या लोकांकडं दलालमार्फत विक्री केली जाते. मुलींना खरेदीदार मिळण्यास उशीर होत असल्यानं टोळीचे सदस्य या अल्पवयीन मुलींवर दररोज बलात्कार करत असतात.

हेही वाचा: Karni Sena : करणी सेनेच्या नगर मंत्र्याची चाकूने भोसकून हत्या; 3 आरोपींना अटक

पाच आरोपींना अटक

दरम्यान, पोलिसांच्या विशेष पथकानं टोळीच्या संभाव्य अड्ड्यांवर छापा टाकून पाच आरोपींना अटक केलीय. पोलिसांच्या ताब्यात आलेल्या या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ती स्वतः या आदिवासी भागातील रहिवासी आहे. ती पतीसोबत हे रॅकेट चालवत होती. वनराज, त्याची पत्नी दिवाली, रमीबेन, दलपत आणि नागजी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. नागजी हा या संपूर्ण रॅकेटचा मास्टर माईंड आहे.

Web Title: Big Smuggling Tribal Girls Of Rajasthan Is Being Supplied To Maharashtra And Gujarat Sirohi Police Mamta Gupta

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..