Joshimath : जोशीमठच्या धोक्याबाबत मोठी अपडेट! आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Joshimath Landslide

Joshimath : जोशीमठच्या धोक्याबाबत मोठी अपडेट! आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती

डेहराडून : उत्तराखंड येथील जोशीमठ या डोंगराळ भागातील उच्च भागातील धोक्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आपत्ती व्यवस्थापन सचिव रणजीत कुमार सिन्हा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. इथले चार वॉर्ड्स आजिबात सुरक्षित नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: ShivSena Symbol: शिंदे गटाच्या 7 जिल्हा प्रमुखांवर ठाकरे गटाचा आक्षेप; कागदपत्रातील त्रुटी काढल्या शोधून?

सिन्हा म्हणाले, जोशीमठ येथील चार वॉर्ड हे पूर्णपणे असुरक्षित घोषीत करण्यात आले आहेत. तर उर्वरित वॉर्ड्सवर अंशतः परिणाम झाला आहे. या भागात अनेक संघटनांकडून संशोधन सुरु आहे. जोशीमठ भागाच्या सुरक्षेबाबत आम्ही देखील अंतिम अहवाल घेऊन येणार आहोत. पावसाच्या पार्श्वभूमीवर आम्ही इथं पुरेशी तयारी केली आहे.

हेही वाचा: PM Modi: 'मोदी है तो मुमकीन है'; भाजप कार्यकर्त्यांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर PM मोदी नाराज!

यामध्ये एक दिलासादायक बातमी अशी आहे की, इथल्या जेपी कॉलनीमध्ये जमा झालेलं पाणी कमी होत आहे. या ठिकाणाहून विस्थापित होत असलेल्या नागरिकांची सुरक्षित आश्रयस्थान उभारण्याची तयारी सुरु असून आठवड्याभरात ही घरं तयार होतील. जोशीमठ भागात मोठ्या प्रमाणावर भेगा दिसून आल्यानंतर इथल्या शेकडो नागरिकांना सुरक्षिस्थळी हालवण्यात आलं आहे. यापार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील सरकारनं यापूर्वीच इथल्या पीडितांसाठी कोट्यवधी रुपयांचे दिलासा पॅकेजही जाहीर केलं आहे.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

इस्त्रोनं दिला होता धोक्याचा इशारा

इस्रोनं आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून ७ ते १० जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये जोशीमठचे फोटो घेतले आहेत. त्यावर तांत्रिक प्रक्रिया केल्यानंतर हे लक्षात आलं की, कोणता भाग खचला आणि कोणता भाग खचू शकतो. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत जमीन खचण्याचा वेग कमी होता. या कालावधीत जोशीमठ ८ ते ९ सेंटिमीटरपर्यंत खचला होता. पण २७ डिसेंबर पासून ८ जानेवारी २०२३ पर्यंतच्या १२ दिवसांमध्ये ही तीव्रता ५.४ सेटिंमीटर झाली आहे, त्यामुळे जमीन खचण्याचा वेग वाढला आहे.

टॅग्स :Desh news