'मोदी है तो मुमकीन है'; भाजप कार्यकर्त्यांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर PM मोदी नाराज! : PM Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi

PM Modi: 'मोदी है तो मुमकीन है'; भाजप कार्यकर्त्यांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर PM मोदी नाराज!

नवी दिल्ली : भाजपच्या कार्यकर्त्यांमधील 'मोदी है तो मुमकीन है' या अतिआत्मविश्वासावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत कार्यकर्त्यांचे कान टोचताना त्यांनी निवडणुका हलक्यात घेऊ नये यासाठी काही सल्ले देखील दिले आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. (PM warns BJP workers against overconfidence)

हेही वाचा: ShivSena Symbol: शिंदे गटाच्या 7 जिल्हा प्रमुखांवर ठाकरे गटाचा आक्षेप; कागदपत्रातील त्रुटी काढल्या शोधून?

राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजप कार्यकर्त्यांचे कान मोदींनी टोचले आहेत. तसेच त्यांना लोकांमध्ये जाऊन त्यांना सरकारच्या योजना समाजावून सांगण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत केली पाहिजे. केवळ 'मोदी आहेत तर आपण जिंकू' असं कॅम्पेन करत अतिआत्मविश्वास ठेऊ नये असंही मोदींनी त्यांना सल्ला देताना म्हटलं आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजप सत्तेत नाही, या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे.

हेही वाचा: Viral Video: धक्कादायक! बंगळुरुमध्ये तरुणानं वृद्ध व्यक्तीला दुचाकीसह नेलं फरफटत

मोदी यावेळी असंही म्हणाले की, २०२४ च्या निवडणुकीसाठी आता केवळ ४०० दिवसचं बाकी आहेत. त्यामुळं कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे. तसेच त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की, मोदी सरकारनं सर्जिकल स्ट्राईक केला कारण तुम्ही त्यांना निवडून दिलं.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

18-25 वयोगटातील तरुणांना टार्गेट करा

दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदींनी सांगितलंय की १८ ते २५ वयोगटातील तरुणांना मागील सरकारांच्या चुका माहिती नाहीत. पण आता भारत कसा चांगल्या प्रकारे काम करत आहे हे त्यांना सांगितलं पाहिजे.

टॅग्स :BjpNarendra ModiDesh news