'चमकी'मुळे बिहारमध्ये 84 बालकांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 16 जून 2019

- आत्तापर्यंत झाला 84 बालकांचा मृत्यू.

- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला बिहार दौरा.

मुजफ्फरपूर : बिहारच्या मुजफ्फरपूर येथे चमकी तापामुळे (अॅक्यूट इन्सेफलाइटिस सिंड्रोम) आत्तापर्यंत 84 बालकांचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेची केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन बिहार दौऱ्यावर पोहोचले आहेत.  

चमकी तापामुळे काल (शनिवार) रात्रीपर्यंत 80 बालकांचा मृत्यू झाला होता. मात्र, आज सकाळी पुन्हा 4 बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता मृत बालकांची संख्या 84 वर पोहोचली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी रुग्णालयात जाऊन उपचार सुरू असलेल्या बालकांची विचारपूस केली. तसेच त्यांनी बालकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली.

दरम्यान, तापाच्या साथीमुळे तज्ज्ञ डॉक्टरांचे एक विशेष पथक मुजफ्फरपूरमध्ये दाखल आहे. उष्णतेच्या लाटेमुळे बालकांना हा आजार होत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Bihar 84 Children Died due to Chamki Fever