
वाढत्या गुन्हेगारीबाबत बोलताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं वादग्रस्त असं विधान केलंय. बिहारमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. हत्या, गोळीबार, सुपारी किलिंग यांसारख्या घटना वाढल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. राज्यात अनेक जिल्ह्यात सिरियल किलिंगच्या घटनाही घडल्या आहेत. सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. य़ातच वरिष्ठ अधिकाऱ्यानं केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय.