esakal | 'मोदींना 6 भाऊ-बहीण'; नितीश कुमारांच्या 8-9 मुलांच्या टीकेवर तेजस्वींचा पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

tajaswi yadav.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election 2020) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे

'मोदींना 6 भाऊ-बहीण'; नितीश कुमारांच्या 8-9 मुलांच्या टीकेवर तेजस्वींचा पलटवार

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election 2020) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरु ठेवली आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी पलटवार करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. नितीश कुमार माझ्या कुटुंबीयांवर टिप्पणी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. कारण मोदी यांना 6 भाऊ-बहीण आहेत. नितीश कुमार यांनी ज्या प्रकारच्या भाषेचा वापर केला, त्यामुळे त्यांनी महिला आणि माझ्या आईच्या भावनांचा अपमान केला आहे, असं तेजस्वी म्हणाले आहेत. 

लालूंच्या कुटुंबाविषयी नितीश कुमार काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, ''हे असे लोक आहेत ज्यांना आपल्या मुलींवर विश्वास नाही. या लोकांनी मुलांसाठी अनेक मुलींना जन्म दिला. असे लोक महिलांचा काय सन्मान करणार. हे लोक कशाप्रकारचा बिहार बनवू पाहात आहेत. कोणालाही बिहारची चिंता नाही, 8-8, 9-9 मुलांना जन्म दिला आहे. मुलींवर त्यांना विश्वास नाही. अनेक मुली झाल्यानंतर मुलगा झाला.'' 

काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या अभिनेत्री खुशबू पोलिसांच्या ताब्यात

तेजस्वी यादव यांनी यावर प्रत्युत्तर दिले. नितीश कुमार महिलांचा अपमान करत आहेत. त्यांनी आमच्या आईचा अपमान केला आहे. ते आर्थिक स्थिती, भ्रष्टाचार, बेरोजगारी सह अन्य मुद्द्यावर काही बोलत नाहीत, असे ते म्हणाले. नितीश कुमार यांनी निवडणूक सभेत पहिल्यांदाच लालू यादव यांच्या कुटुंबीयांवर पर्सनल अटॅक केला आहे. मुद्दांना न सोडता बोलणारा नेता अशी नितीश कुमार यांची प्रतिमा आहे. 

मंगळवारी तेजस्वी यादव यांनी ट्विट केले. आदरणीय नितीश कुमारजी तुम्ही कितीही माझ्याबद्दल अपशब्द वापरा, पण ते मी आशिर्वाद म्हणूनच घेईन. नितीश कुमार शारीरिक-मानसिकरित्या थकले आहेत. त्यामुळे ते मनात येईल ते बोलत आहेत. मी त्यांच्या प्रत्येक शब्दाला आशिर्वादाच्या स्वरुपात घेत आहे. यावेळी बिहारच्या लोकांनी ठरवलंय की रोटी-रोजगार आणि विकासच्या मुद्द्यावरच निवडणूक होणार, असं ते ट्विटमध्ये म्हणाले होते.