
Election Commission announces Bihar Assembly Election dates; voters advised to follow 10 important guidelines to ensure smooth and fair polling.
esakal
Bihar Assembly Election Dates announced: बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखांचा आज(सोमवार) निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. यंदा बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहे. मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. ही माहिती निवडणूक आय़ोगाने पत्रकारपरिषद घेत सुरुवातीला दिली. याचबरोबर विशेषकरून मतदारांना निवडणूक आयोगाकडून खालील दहा महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत. -
१. निवडणूक आयोगाने म्हटलं, सर्वात आधी मतदारांना आमचा एक संदेश असेल. कृपया आपलं नाव इलेक्ट्रोलरोलमध्ये नक्कीच तपासा.
२. जर अजूनही नाव सुटलेलं आहे तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दहा दिवसआधीपर्यंत नाव जोडलं जाऊ शकतं.
३.कृपया आपलं पोलिंग स्टेशनबाबत निवडणूक आय़ोगाच्या अधिकृत वेबसाइटवरून (ECI Net) माहिती करून घ्यावी किंवा आपल्या बुथ लेव्हल ऑफिसकडून त्याबाबत समजून घ्यावे.
४.तुम्ही जेव्हा मतदान करतात आणि चुकून कोणत्यातरी कारणामुळे जर तुम्ही तुमचं मतदारकार्ड आणलं विसरलात. तर १२ पर्यायी कागदपत्र असतात, ज्याने तुम्ही तुमची ओळख दर्शवू शकतात आणि त्यानंतर मतदानाचा हक्क बजावू शकतात.
५.मतदारांनी याची खात्री करून घ्यावी की, प्रत्येक मतदान केंद्रावर AMF सुविधा उपलब्ध असेल. व्होटर इन्फॉर्मेशन स्लीप प्रत्येक मतदारास पोहचवली जाईल.
६.जर तुम्ही मोबाइल घेऊन आलात तर डिपॉझिट सुविधाही असेल, तुम्ही पूर्णपणे निश्चित रहावे.
७.नोकरदारा मतदार आहात, तर तुम्हाला पोस्टल बॅलेटची सुविधा असेल.
८.जर तुम्ही दिव्यांग आहात किंवा ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहात, तर तुम्हाला घरून मतदानाची सुविधा दिली जाईल. अट एवढीच आहे की, तुम्हाला फॉर्म १२ ड भरावा लागेल.
९.मतदान करण्याआधी आपल्या उमेदवाराबाबत नक्कीच माहिती करून घ्यावी. यासाठी तुम्ही know your Candidate App चाही वापर करू शकतात.
१०.जर कोणताही उमेदवार किंवा राजकीय पक्ष आदर्श आचार संहितेचा भंग करत असेल, तर तुम्ही सी व्हिझिल अप वर तुम्ही माहिती देवू शकतात. याशिवाय १९५० या क्रमांकावरही तुम्ही कळवू शकतात किंवा निवडणूक अधिकाऱ्यासही तुम्ही सांगू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.