Bihar Election Record Break Voting : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात नोंदवला गेला मतदानाचा नवा रेकॉर्ड ; आता सर्वांनाच प्रतीक्षा निकालाची!

Bihar Assembly Election 2025 Phase Second Voting: सायंकाळी पाच वाजेपर्यंतच झाले होते ६७.१४ टक्के मतदान ; जाणून घ्या, किती उमेदवार होते रिंगणात आणि इतर महत्त्वाची अपडेट
Bihar Election Record Break Voting : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात नोंदवला गेला मतदानाचा नवा रेकॉर्ड ; आता सर्वांनाच प्रतीक्षा निकालाची!

esakal

Updated on

Bihar Vidhansabha Election 2025 Update :बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज(मंगळवार) मतदान पार पडले. १२२ जागांसाठी तब्बल १ हजार ३०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. विशेष म्हणजे मतदानाच्या या दुसऱ्या टप्प्यात बिहारमधील मतदानाचे आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. प्राप्त माहितीनुसार सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६७ टक्क्यांहून अधिक मतदान झालेले होते.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता संपले आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, मतदान केंद्रांवर रांगेत उभे असलेल्या मतदारांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले . आता शुक्रवार १४ नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांना उत्सुकता आहे. 

मतदानाच्या या दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांचाही उमेदवार म्हणून समावेश आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी मतदान ६५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते.

Bihar Election Record Break Voting : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात नोंदवला गेला मतदानाचा नवा रेकॉर्ड ; आता सर्वांनाच प्रतीक्षा निकालाची!
Lakhan wins Double Hind Kesari : नाद करायचा नाय..! आधीच 'ट्रिपल हिंद केसरी' असणाऱ्या ‘लखन’नं मारलं ‘डबल हिंद केसरी’चंही मैदान

सुरक्षित आणि पारदर्शक मतदान प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी राज्यभरात मोठ्यासंख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील बहुतेक जागा सीमांचल प्रदेशात आहेत, जिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे हा टप्पा एनडीए आणि इंडिया आघाडी या दोघांसाठीही महत्त्वाचा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com