Tejashwi Yadav Vs Nitish Kumar: बिहार विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमारांना तेजस्वी यादव यांनी दिला झटका!

JDU Vs RJD in Bihar Election 2025 : माजी खासदार, आमदारासह नेत्यांची जेडीयूला सोडचिठ्ठी अन् रादजमध्ये प्रवेश; बिहारचं राजकारण तापलं!
Tejashwi Yadav welcomes a senior JDU leader into RJD ahead of the Bihar Assembly Elections 2025, intensifying the political rivalry with Nitish Kumar.

Tejashwi Yadav welcomes a senior JDU leader into RJD ahead of the Bihar Assembly Elections 2025, intensifying the political rivalry with Nitish Kumar.

esakal

Updated on

Tejashwi Yadav’s Political Move Ahead of Bihar Elections: बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या पक्ष जनता दल युनायटेड (जेडीयू) ला मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार आणि आमदारासह अनेक प्रमुख नेत्यांनी आज (शुक्रवार) तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय जनता दलात (राजद) प्रवेश केला आहे.

तेजस्वी यादव यांनी बिहारची राजधानी पाटणा येथे पत्रकार परिषद घेऊन हे सर्वजण राजदमध्ये सामील झाल्याची घोषणा केली आणि त्यांचे स्वागत केले. तसेच यावेळी तेजस्वी यादव म्हणाले की, बिहार सरकार नितीश कुमार चालवत नाहीत तर दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेते चालवत आहेत. जेडीयूसाठी ज्यांनी कठोर परिश्रम केले आहेत त्यांना हवा तो आदर मिळत नाही.

याचबरोबर तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, भाजप जेडीयूला नष्ट करण्याचे काम करत आहे. गेल्या वेळी जेव्हा नितीश कुमार यांना हे कळले तेव्हा ते आमच्यासोबत आले होते. त्यानंतर काही दिवस आम्ही एकत्र सरकार चालवले, पण आता आमच्या काकांना हायजॅक करण्यात आलं आहे.

Tejashwi Yadav welcomes a senior JDU leader into RJD ahead of the Bihar Assembly Elections 2025, intensifying the political rivalry with Nitish Kumar.
Hemant Soren on Bihar Election : हेमंत सोरेन यांनी वाढवलं RJDचं टेन्शन? बिहार निवडणुकीसाठी केली ‘ही’ मोठी मागणी!

जेडीयूला बांका येथून धक्का बसला आहे, जिथे विद्यमान खासदार गिरधारी यादव यांचा मुलगाही आरजेडीमध्ये सामील झाला आहे. याचा अर्थ असा आहे की वडील नितीश कुमार यांच्या पक्षाचे खासदार असताना,  मुलाने मात्र तेजस्वी यादव यांच्या राजदमध्ये प्रवेश केला आहे.

Tejashwi Yadav welcomes a senior JDU leader into RJD ahead of the Bihar Assembly Elections 2025, intensifying the political rivalry with Nitish Kumar.
Prashant Kishor Bihar Election 2025 : प्रशांत किशोर निवडणूक लढवणार नाही? ; जन सूराज पार्टीची पहिली उमेदवार यादी जाहीर

अनेक प्रमुख नेते राजदमध्ये दाखल -

जेडीयू बांका येथील खासदार गिरधारी यादव यांचे पुत्र चाणक्य प्रकाश, जेडीयूचे पूर्णियाचे माजी खासदार संतोष कुशवाह,  जेडीयूचे प्रमुख नेते जगदीश शर्मा यांचे पुत्र राहुल शर्मा जे जेडीयूचे प्रमुख नेते राहिलेले आहेत  आणि अजय कुशवाह ज्यांनी शेवटची विधानसभा निवडणूक वैशाली येथून एलजेपीच्या तिकिटावर लढवली होती यांच्यासह अन्य नेत्यांनी राजदमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com