Bihar Assembly Elections 2025: मोठी बातमी! बिहार विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला?

Bihar Assembly Election Update : निवडणूक आयोगाची बिहारमधील प्रमुख राजकीय पक्षांशी झाली सविस्तर चर्चा
Election Commission officials in discussion with representatives of political parties ahead of the Bihar Assembly elections to ensure smooth and transparent polling process.

Election Commission officials in discussion with representatives of political parties ahead of the Bihar Assembly elections to ensure smooth and transparent polling process.

esakal

Updated on

Election Commission holds key meeting for Bihar Assembly polls : बिहार विधानसभा निवडणुकीचं काउंटडाउन सुरू झालं आहे. शनिवारी बिहारमधील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत, राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला छठपूजेनंतर लगेचच बिहारमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. कारण, यामुळे निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या अधिक वाढेल, असा अंदाज वर्तवला गेला आहे.

 दिवाळीनंतर साजरा होणारा छठ हा सण बिहारमध्ये खूप महत्त्वाचा आहे. यावर्षी २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हा सण साजरा होणार आहे. या सणासाठी काम-धंद्यासाठी परराज्यात गेलेले लाखो बिहारी आपल्या राज्यात येत असतात. त्यामुळे,  त्यावेळी निवडणुका घेतल्याने मतदारांची संख्याही वाढण्याची शक्यता अधिक असते. राजकीय पक्षांनी केलेल्या या सूचनेचा निवडणूक आयोगाकडून सकारात्मकरित्या विचार होईल, असे दिसत आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त हा छठपूजा या सणानंतरच राहणार असल्याचे चिन्हं सध्या तरी दिसत आहे.

प्राप्त माहितीनुसार या महत्त्वपूर्ण बैठकीस बिहारमधील सहा राष्ट्रीय आणि सहा प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त एसएस संधू आणि विवेक जोशी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान, या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी शक्य तितक्या कमी टप्प्यात निवडणुका घेण्याच्या गरजेवरही भर दिला.

Election Commission officials in discussion with representatives of political parties ahead of the Bihar Assembly elections to ensure smooth and transparent polling process.
Gautami Patil Missing? : गौतमी पाटील ''गेली कुठं गावना...'' ; पुणे पोलिसांची नोटीस मिळाल्यापासून गायब!

सध्याच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. तर निवडणूक आयोगाचे अधिकारी बिहारमधील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी पाटण्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे निवडणुकीचा पहिला टप्पा छठ नंतर लगेचच ऑक्टोबरच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये, बिहारच्या विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात झाल्या पार पडल्या होत्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com