Gautami Patil Missing? : गौतमी पाटील ''गेली कुठं गावना...'' ; पुणे पोलिसांची नोटीस मिळाल्यापासून गायब!

Gautami Patil missing after Pune Police notice : जाणून घ्या, या प्रकरणात डीसीपी संभाजी कदम यांनी नेमकी काय माहिती दिली आहे?
gautami patil

gautami patil

esakal

Updated on

Gautami Patil Latest Updates : पुणे गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी गौतमी पाटील ला सिंहगड रोड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. गौतमी पाटीलच्या नावे असणाऱ्या वाहनाचा अपघात झाला असून, आपलं म्हणण मांडण्यासाठी तिने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात यावं असं नोटीशीत म्हटलं गेलंय. विशेष म्हणजे ही नोटीस स्वतः गौतमी पाटीलने स्वीकारले असल्याची माहितीही समोर आली आहे.  मात्र त्यानंतर गौतमी पाटीलशी पोलिसांचा संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे गौतमी पाटील नेमकी गेली कुठे? असा प्रश्न आता निर्माण होतोय.

 दरम्यान, यासंदर्भात डीसीपी  संभाजी कदम यांनी माहिती देताना सांगितले की, ‘’30 तारखेला पहाटे वडगाव ब्रिज खाली हा अपघात झालेला आहे. मरगळे नावाच्या व्यक्तीला दीनानाथ रुग्णालयात दाखल केलं होतं. तर आरोपी भोरवरून पुण्याकडे येत असताना ही दुर्घटना घडलेली आहे. या ठिकाणचे सीसीटीव्ही, लोकशन, साक्षीदार यांची चौकशी करून आरोपीची ओळखही पटलेली आहे. तसेच, आरोपीचे मेडिकल पोलिसांनी केलेले आहे, ब्लड सॅम्पल घेऊन गाडी देखील जप्त केलेली आहे.’’

तसेच, ‘’ही गाडी गौतमी पाटील यांच्या नावावर असल्याचे दिसून येते आहे. जखमीच्या नातेवाईकांना संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि  नातेवाईकांच्या तक्रारीचा निरसन करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. प्राप्त माहितीनुसार कारमध्ये आरोपीचे दोन मित्र होते मात्र अपघात होण्यापूर्वी ते खाली उतरले होते. अपघात झाला तेव्हा कारचालक एकटाच होता. चंद्रकांत पाटील यांना पूर्ण घटनेची वस्तुस्थिती सांगितलेली आहे. अशीही माहिती डीसीपी संभाजी कदम यांनी दिली आहे.’’ याशिवाय, जखमी व्यक्तीच्या नातेवाईकांना सोबत घेऊन सिंहगड रोड पोलिसांनी खेडशिवापूर टोल नाका, नवले ब्रिज पेट्रोल पंप आणि एका हॉटेलमधील CCTV दाखविला आहे.

gautami patil
Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

गौतमी पाटीलच्या गाडीचा नवले पुलावर अपघात झाला होता. यावेळी एका रिक्षाला धडक बसली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. समाजी मरगळे असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांच्या मुलीने कारवाईसाठी सिंहगड पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले होते. चंद्रकांत पाटील यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी चौकशी करून समाजी मरगळे यांची मुलगी अपर्णा मरगळे यांना पुरावे दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com