

Bihar Exit Polls
Sakal
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तत्पूर्वी मतदानानंतर सुमारे १५ एक्झिट पोल जाहीर झाले होते आणि ज्यापैकी १४ एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळेल, असे भाकीत केले होते. ‘एक्झिट पोलमध्ये महाआघाडीला फारच कमी आघाडी मिळेल किंवा बहुमताच्या आसपास दाखवले गेले होते. तर तिसरी आघाडी म्हणवून घेणाऱ्या जनसुराज पक्षाला बहुतेक एक्झिट पोलनी स्थान दिले नव्हते.