esakal | बिहार निवडणुकीत नवा पक्ष; लंडनमध्ये शिकणाऱ्या पुष्पमचा आगामी मुख्यमंत्रिपदावर दावा
sakal

बोलून बातमी शोधा

bihar assembly election pushpam chaudhary advertisement for cm post

मूळची दरभंगा जिल्ह्याची रहवासी पुष्पम उच्चशिक्षित आहे. त्यामुळंच्या जाहिरात कॅम्पनेला सगळ्यांची गांभीर्यानं घेतलं असून, कालपासून बिहारमध्ये तिचीच चर्चा सुरू आहे.

बिहार निवडणुकीत नवा पक्ष; लंडनमध्ये शिकणाऱ्या पुष्पमचा आगामी मुख्यमंत्रिपदावर दावा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पाटणा : लंडनमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीनं थेट बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर दावा केलाय. तिच्या या दाव्यामुळं बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा अप्रत्यक्ष बिगुल वाजला आहे. नितीशकुमार यांच्या सरकारला खाली खेचण्यासाठी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस एकत्रित मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडं पुष्पम प्रिया चौधरीच्या दाव्यामुळं बिहारमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलंय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिहारमध्ये सर्वत्र रविवारच्या वर्तमानपत्रातील जाहिराती आणि पाटणामधील होर्डिंग्जमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.  पुष्पम प्रिया चौधरीनं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदावर दावा केलाय. या वर्षा अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर  पुष्पम चौधरीच्या दाव्यामुळं सगळ्यांनी आश्चर्याने डोळे मोठे केले आहेत. मूळची बिहारचीच असलेली पुष्पम सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळं ती निवडणुकीच्या आधीच बिहारमध्ये सक्रीय होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

राणा कपूर यांच्या कुटुंबाच्या 20 बनावट कंपन्या, येस बँकेतून सर्व व्यवहार

कोण आहे पुष्मप?
पुष्पम प्रिया चौधरी ही, मूळची बिहारची आहे. पुष्पम ही संयुक्त जनता दलाचे नेते विनोद चौधरी यांची कन्या आहे. मूळची दरभंगा जिल्ह्याची रहवासी पुष्पम उच्चशिक्षित आहे. त्यामुळंच्या जाहिरात कॅम्पनेला सगळ्यांची गांभीर्यानं घेतलं असून, कालपासून बिहारमध्ये तिचीच चर्चा सुरू आहे. मुळात विनोद चौधरी हे सत्ताधारी संयुक्त जनता दलाचे नेते आहेत. त्यांच्याच मुलीनं अशा पद्धतीने स्वतःची दावेदारी केल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे. पुष्पमनं स्वतःच्या पक्षाचं नाव प्लुरल्स असं सांगितलंय. जण गन सबका शासन (लोकशाही सगळ्यांचं सरकार) अशी तिच्या पक्षाची टॅगलाईन आहे. संयुक्त जनता दलाच्या नेत्याच्या मुलीनं मुख्यमंत्रिपदावर दावा केल्यामुळं पक्षाची गोची झाली आहे. एका बाजुला संयुक्त जनता दलापुढं राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांचे आव्हान आहे. निवडणुकीत पक्षाला या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. त्यातच पुष्पमचं नवं आव्हान आता संयुक्त जनता दलापुढं आहे. 

बिहारला शांतता हवी आहे. बिहारला पंख हवे आहेत. बिहारला बदल हवाय. कारण, बिहार यापेक्षा चांगल्यासाठी पात्र आहे आणि ते शक्य आहे. वाईट राजकारणाला नकारूया. तुम्हाला बिहारला 2020मध्ये उडण्यासाठी पंख द्यायचे असतील तर, प्लुरल्स जॉईन करा.
- पुष्पम प्रिया चौधरी, प्रमुख प्लुरल्स पक्ष 

आणखी वाचा - येस बँकेत खाते आहे? आता चिंता नको

पुष्पम ही सज्ञान आहे आणि उच्चशिक्षित आहे. मुख्यमंत्रिपदाचा दावा आणि तिचा पक्ष, हा तिचा स्वतःचा निर्णय आहे. जर, तिनं पक्षातीलच ज्येष्ठ नेत्यांना आव्हान दिलं तर, पक्ष ते खपवून घेणार नाही. 
- विनोद चौधरी, नेते, संयुक्त जनता दल

loading image