esakal | Bihar Election: रात्री उशिरापर्यंत चालणार मतमोजणी, निवडणूक आयोगानं सांगितलं कारण
sakal

बोलून बातमी शोधा

counting main.jpg

आतापर्यंत एक कोटींहून अधिक मतांची मोजणी झालेली आहे.

Bihar Election: रात्री उशिरापर्यंत चालणार मतमोजणी, निवडणूक आयोगानं सांगितलं कारण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली Bihar Election 2020 -  बिहार विधानसभा निवडणुकीचा मतमोजणी सुरु असतानाच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत एक कोटींहून अधिक मतांची मोजणी झालेली आहे. पोलिंग बुथची संख्या यावेळी 63 टक्क्यांहून अधिक होती, असे निवडणूक उपआयुक्त चंद्रभूषण यांनी सांगितले. 2015 मध्ये 38 जागांवर पोलिंग बुथ होते. परंतु, यावेळी 58 पोलिंग बुथ आहेत. 

बिहारचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एचआर श्रीनिवास म्हणाले की, यावेळी सुमारे 4.10 कोटी मतदान झाले आहे. आतापर्यंत 92 लाख मतांची मोजणी झालेली आहे. पूर्वी 25-26 फेरीत मतमोजणी होत असत. यावेळी किमान 35 फेरीपर्यंत मतमोजणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु राहू शकते. 

हेही वाचा- Bihar Election : शिवसेनेच्या तुतारीचा आवाज दुमदुमलाच नाही; डिपॉझीट जप्त होण्याची चिन्हे

मतमोजणी 19 ते 51 फेरीपर्यंत होऊ शकते. हे मत मोजणीवर अवलंबून आहे. आयोगाने 35 फेरींचा अंदाज लावला आहे. काही विधानसभांमध्ये मतमोजणीच्या 19 फेरी होऊ शकतात. तर काही ठिकाणी 51 फेऱ्या होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा- Bihar Election: 2005 मध्ये पासवान यांनी बिघडवलं होतं गणित, चिराग इतिहासाची पुनरावृत्ती करणार?

आयोगाने पुन्हा एका इव्हीएमच्या विश्वसनीयतेवर प्रतिक्रिया दिली. इव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असून त्याच्यात कोणताच फेरफार करता येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.