
Chirag Paswan LJP demands more seats in Bihar elections: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येत आहे. एकीकडे सत्ताधारी NDA आघाडीचे जागा वाटप जवळपास निश्चित झालेले आहे. असे असताना आता एनडीए आघाडीचाच भाग असणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने एक मोठा दावा करत, एनडीएचं टेन्शन वाढवल्याचे समोर आलं आहे. प्राप्त माहितीनुसार या पक्षाने ४३ ते १३७ जागांवर आपला दावा मांडलेला आहे, विशेष म्हणजे त्यांनी यामागचे कारणही सांगितले आहे.
चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील एलजेपी (रामविलास) चे बिहार प्रभारी आणि खासदार अरुण भारती यांनी जागांबद्दल मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्ही सन्माननीय जागांवर निवडणूक लढवू आणि माझे मत असे आहे की ४३ ते १३७ जागांमधील जागा सन्माननीय असतील. तर, त्यांनी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचेही सांगितले आहे.
अरुण भारती यांनी त्यांच्या मागणीच्या समर्थनार्थ युक्तिवाद केला की २०१५ मध्ये आम्ही ४३ जागांवर निवडणूक लढवली होती आणि २०२० मध्ये आम्ही १३७ जागांवर निवडणूक लढवली होती. अशा परिस्थितीत, या दोघांमधील जागा आमच्यासाठी सन्माननीय असतील. याचबरोबर भारती यांनी एनडीएच्या जागावाटप सूत्रात लोजपाला २० जागा मिळतील अशा बातम्यांचेही खंडण केलय.
याशिवाय अरुण भारती म्हणाले की, आमचा पक्ष जेडीयूसोबत एकत्र निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ असेल. सर्वांचा आदर करणे आणि एकत्र वाटचाल करणे ही आघाडीतील मोठ्या पक्षांची जबाबदारी आहे. जागावाटपावर सध्या कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असा दावा त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.