Mahua Moitra : अमित शहांबाबत वादग्रस्त विधान करणं महुआ मोइत्रांना भोवणार? ; बंगालमध्ये गुन्हा दाखल!

Mahua Moitra faces FIR in Bengal: भाजपने घेतली आक्रमक भूमिका, पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
TMC leader Mahua Moitra faces legal trouble after a controversial remark on Amit Shah, with an FIR filed in Bengal.
TMC leader Mahua Moitra faces legal trouble after a controversial remark on Amit Shah, with an FIR filed in Bengal.sarkarnama
Updated on

Mahua Moitra’s remark on Amit Shah sparks controversy: तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील कृष्णनगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नादिया येथील कोतवाली पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे प्रकरण २८ ऑगस्ट २०२५ रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्याबाबत आहे. महुआ मोइत्रा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल असे विधान केले आहे, ज्याला भाजपने द्वेषपूर्ण आणि हिंसक विधान म्हटलय.

महुआ मोइत्रा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बांगलादेशातून भारतात होणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरीला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात पत्रकार परिषदेत महुआ मोइत्रा यांना बांगलादेशातून होणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याच्या उत्तरात त्यांनी गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आणि म्हणाल्या की सीमांची सुरक्षा ही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे, परंतु अमित शाह ही जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत.

TMC leader Mahua Moitra faces legal trouble after a controversial remark on Amit Shah, with an FIR filed in Bengal.
ED Notice : ‘ED’चे मोठे पाऊल!, इंटरपोलकडून पहिल्यांदाच पर्पल नोटीस जारी

भारताच्या सीमेवरून दररोज घुसखोरी होत आहे. कधी दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करतात, तर कधी ड्रोन आणि ड्रग्ज तस्कर पंजाबमध्ये घुसखोरी करतात. बांगलादेशातून दररोज बेकायदेशीर घुसखोरी होत आहे. या घुसखोरीमुळे भारतात गुन्हेगारी घटना घडत आहेत. माता-भगिनींना लक्ष्य केले जात आहे. त्यांची हत्या करून जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. जर गृहमंत्री अमित शहा सीमांचे रक्षण करू शकत नसतील तर त्यांचे शिरच्छेद करून टेबलावर ठेवले पाहिजे.

TMC leader Mahua Moitra faces legal trouble after a controversial remark on Amit Shah, with an FIR filed in Bengal.
Nitish Kumar : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांची महिलांसाठी मोठी घोषणा, म्हणाले...

भारतीय जनता पक्षाने महुआ मोइत्रा यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे आणि हे विधान लज्जास्पद, घृणास्पद आणि द्वेषाने भरलेले म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी महुआ मोइत्रा यांचे विधान त्यांची आणि तृणमूल काँग्रेसची हिंसक मानसिकता असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com