esakal | विधानसभा अध्यक्षांनी चार महिन्यांनी चूक केली मान्य
sakal

बोलून बातमी शोधा

विधानसभा अध्यक्षांनी चार महिन्यांनी चूक केली मान्य

बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी चार महिन्यानंतर चूक मान्य केली आहे.

विधानसभा अध्यक्षांनी चार महिन्यांनी चूक केली मान्य

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पाटणा - बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी चार महिन्यानंतर चूक मान्य केली आहे. वर्षाच्या सुरुवातीला 23 मार्च रोजी पोलिसांकडून आमदारांना झालेली मारहाण चुकीची आणि अक्षम्य अशी असल्याचं त्यांनी म्हटलं. विधानसभेत बुधवारी या गोंधळावर विशेष चर्चा झाली. यामध्ये सर्व सदस्यांच्या भाषणानंतर विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा म्हणाले की, आमदारांना बूटाने मारणं चुकीचं आहे आणि यासाठी कधीच माफ करता येणार नाही. चुक झाली आहे, अपमान झालाय पण अपमान कोणत्या पदाचा नाही तर सभागृहाचा झाला आहे. कोणत्याही आमदाराला बूटाने मारलं तर तो आमदाराचा नाही तर आमदारकीचा अपमान आहे.

विशेष चर्चेवेळी संसदीय कामकाज मंत्री विजय कुमार चौधरी यांनी सांगितलं की, सदनात पोललिसांना आत बोलावण्याचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांचा होता आणि यामध्ये राज्य सरकारची कोणतीही भूमिका नव्हती. चौधरी यांनी स्पष्ट सांगितलं की, जो काही निर्णय घेण्यात आला आणि सभागृहात जी कारवाई झाली तो निर्णय विधानसभा अध्यक्षांचा होता.

हेही वाचा: देशातील निम्मे रुग्ण केरळात; राज्यात संपूर्ण लॉकडाऊन

विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सभागृहात पोलिस बोलावण्याचा आणि आमदारांना मारहाणीसाठी चिथावल्या प्रकरणी सरकारला दोषी ठरवलं आहे. चर्चेची सुरुवात करताना त्यांनी सतत विचारलं की, आमदारांना मारहाण करण्याचा आदेश पोलिसांना कोणी दिला होता?

काय घडलं होतं?

बिहारच्या विधानसभेत देशाच्या इतिहासात कधी घडलं नाही अशी घटना 23 मार्च 2021 रोजी घडली होती. बिहार पोलिसांनी विधेयकाचा निषेध करणाऱ्या विरोधी पक्षांतील राजदच्या आमदारांना फरफटत सभागृहातून बाहेर काढलं होतं. यावेळी काही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आमदारांना मारहाण करताना लाथेनं मारलं होतं.

loading image
go to top