esakal | देशातील निम्मे रुग्ण केरळात; राज्यात संपूर्ण लॉकडाऊन
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 43 हजार 159 नवे रुग्ण सापडले आहेत.

देशातील निम्मे रुग्ण केरळात; राज्यात संपूर्ण लॉकडाऊन

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 43 हजार 159 नवे रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत 38 हजार 525 जण कोरोनामुक्त झाले. बुधवारी दिवसभरात 640 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशात कोरोनावर उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 97 हजार 330 इतकी आहे. गेल्या 24 तासात यामध्ये 3 हजार 987 रुग्णांची वाढ झाली. गेल्या 77 दिवसांमध्ये ही वाढ सर्वाधिक आहे.

भारतात सर्वाधिक चिंता केरळमुळे वाढली असून तिथे सलग दुसऱ्या दिवशी 22 हजार रुग्ण सापड़ले आहेत. यामुळे केरळमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 27 जुलैरोजी केरळमध्ये 22 हजार 129 रुग्ण सापडले होते. तर 28 जुलै रोजी 22 हजार 56 रुग्णांची नोंद झाली. सध्या केरळ हे एकमेव असं राज्य आहे जिथं 1 लाखांपेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आहेत.

केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 31 जुलै आणि 1 ऑगस्टला राज्यात पूर्ण लॉकडाऊन असेल अशी घोषणा करण्यात आली आहे.

देशातील कोरोना आकडेवारी

24 तासात

नवीन रुग्ण - 43 हजार 509

कोरोनामुक्त - 38 हजार 465

मृत्यू - 640

आतापर्यंत

एकूण बाधित रुग्ण - 3 कोटी 15 लाख

एकूण कोरोनामुक्त - कोटी 6 लाख

एकूण मृत्यू - 4 लाख 22 हजार

सक्रीय रुग्ण - 3 लाख 97 हजार

हेही वाचा: PM मोदी ट्विटरवर सर्वात लोकप्रिय, फॉलोअर्सने ओलांडला विक्रमी टप्पा

आतापर्यंत 46 कोटी 26 लाख 29 हजार 773 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. बुधवारी एका दिवसात 17 लाख 28 हजार 795 चाचण्या झाल्या.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. बुधवारी एका दिवसात राज्यात 6 हजार 757 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 6 हजार 105 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 286 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.53 टक्क्यांवर पोहोचला आहे.

loading image
go to top