

Nitish Kumar resignation Bihar
ESakal
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची वेळ निश्चित झाली आहे. त्यांना बिहार राजभवनातून नियुक्तीपत्र मिळाले आहे. ते मंगळवारी दुपारी सुमारे ३:१५ वाजता आपल्या पदाचा राजीनामा देतील. सोमवारी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सम्राट चौधरी हे बिहारचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, हे चित्र अद्याप अस्पष्ट आहे.