esakal | मुख्यमंत्र्यांपेक्षा मंत्री धनवान; नितिश कुमारांनी जाहीर केली संपत्ती
sakal

बोलून बातमी शोधा

nitish kumar

बिहारमध्ये मावळत्या वर्षातील शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह सर्व मंत्र्यांनी २०२० मध्ये कमावलेली संपत्ती जाहीर केली. 

मुख्यमंत्र्यांपेक्षा मंत्री धनवान; नितिश कुमारांनी जाहीर केली संपत्ती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पाटणा - बिहारमध्ये मावळत्या वर्षातील शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह सर्व मंत्र्यांनी २०२० मध्ये कमावलेली संपत्ती जाहीर केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांचे बहुतेक सर्व मंत्री धनवान आहेत. नितीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे स्थावर व जंगम मालमत्तेसह सुमारे ५७ लाख रुपयांची संपत्ती आहे. 

नितिश कुमार यांच्याकडे १२ गायी, सहा वासरे याचबरोबर संगणक, वातानुकूलन यंत्र, ट्रेड मिल आणि अगदी सायकलचाही समावेश आहे. नितीश कुमार त्यांच्यापेक्षा त्यांचे चिरंजीव नितांश कुमार हे अधिक श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे सुमारे तीन कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यात वारसा हक्काने आलेल्या संपत्तीसह अन्य मालमत्तेचाही समावेश आहे.

हे वाचा - मुकेश अंबानी आणि रिलायन्सवर SEBI ची मोठी कारवाई; शेअर बाजारात गडबड केल्याचा ठपका

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे रोख रक्कम 35 हजार 885 रुपये असून तीन बँक खात्यांमध्ये मिळून 34 हजार रुपये आहेत. तसंच निशांत कुमार यांच्याकडे दोन बँकांमध्ये मिळून 26 हजार रुपये आहेत. तर पीपीएफ खात्यावर 25 लाख 43 हजार रुपये असल्याचं नमूद केलं आहे. 

उपमुख्यमंत्र्यांकडे रोख 54 हजार रुपये असून त्यांच्या पत्नीकडे 44 हजार रुपये आहेत. तर त्यांच्याकडे तीन लाख रुपयांच्या एलआयसी विमा पॉलिसी आहेत. तार किशोर प्रसाद हे गाड्यांचे शौकीन आहेत. त्यांच्या ताफ्यात बोलेरो, टाटा इंडिगो, स्कॉर्पिओ, टोयोटाची इनोव्हा गाडीसुद्धा आहे. तार किशोर प्रसाद यांच्याकडे 50 ग्रॅम सोनं तर पत्नीकडे 400 ग्रॅम सोनं आहे. याशिवाय एक एकर शेतजमीनही आहे.

हेही वाचा - केंद्र सरकारला जीएसटीने दिला हात; संकलनात मोठी वाढ​

मंत्रिमंडळात सर्वाधिक समाज कल्याण मंत्री रामसेवक सिंह यांच्याकडे सर्वाधिक 1 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यांची सोने, चांदी, वाहन, विमा यामध्ये जवळपास 36 लाख रुपयांची गुंतवणूक आहे.

माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्याकडे 2017 मध्ये 94 लाखांहून अधिक संपत्ती होती तर पत्नीकडे 1 कोटी 35 लाखांपेक्षा जास्त संपत्ती होती. 2018 मध्ये सुशील मोदींच्या संपत्तीत वाढ होऊन 1 कोटी 40 लाख इतकी झाली.
 

loading image