केंद्र सरकारला जीएसटीने दिला हात; संकलनात मोठी वाढ 

टीम ई-सकाळ
Saturday, 2 January 2021

कोरोनाच्या टाळेबंदीनंतर सीएसटी (सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स) मध्ये वाढ झाली आहे.

कोरोनाच्या टाळेबंदीनंतर सीएसटी (सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स) मध्ये वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयाकडून शुक्रवारी जाहीर केलेल्या निवेदनात गेल्या काही महिन्यांपासून सीएसटीच्या महसूल संग्रहात वृद्धी झाल्याचे म्हटले आहे. मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी महसूल कलेक्शन झाले आहे. आणि यामध्ये दादरा आणि नगर हवेली मधून सगळ्यात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. येथून होणाऱ्या कलेक्शन मध्ये वार्षिक 68 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. 

दादरा आणि नगर हवेली मधून मागील वर्षाच्या 2019 डिसेंबर महिन्यात 154 करोड रुपये जीएसटी वसुली झाली होती. तर डिसेंबर 2020 मध्ये 259 करोड रुपये जीएसटी वसुली झाली आहे. दादरा आणि नगर हवेली नंतर त्रिपुराने सगळ्यात जास्त वार्षिक वाढ नोंदवली आहे. त्रिपुराने 25 टक्क्यांची वाढ नोंद केली आहे. 

ऐका हो ऐका! नवीन व्यवसाय सुरू करायचाय पण लोन घेण्याबाबत संभ्रमात आहात? मग ही...

वित्त मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात 1,15,174 करोड रुपये महसूल जीएसटी जमा झाला आहे. यामध्ये सीजीएसटी 21,365 कोटी रुपये, आयजीएसटी 57,426 कोटी रुपये (इंटर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स) ज्याच्यामध्ये एखाद्या राज्याने केलेल्या आयातीमुळे 27,050 कोटी रुपये, एसजीएसटी 27,804 कोटी आणि उपकर 8,579 कोटी रुपये केंद्राच्या तिजोरीत जमा झाले आहेत. 

वर्षाच्या अखेरीस 31 डिसेंबर 2020 पर्यंत एकूण 87 लाख जीएसटीआर -3 बी रिटर्न भरले असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. यापूर्वी एप्रिल, 2019 मध्ये सर्वाधिक 1,13,866 कोटी रुपये महसूल जीएसटीतून मिळाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: December GST increased