पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर नितीश यांचा पलटवार,'केंद्रात बसलेल्या लोकांकडे..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nrendra modi

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर नितीश यांचा पलटवार,'केंद्रात बसलेल्या लोकांकडे..."

बिहीरचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या 'भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणारे सरकार' या टिकेवर नितीश कुमारांनी प्रतिउत्तर दिले आहे. नितीश कुमार "म्हणाले केंद्रात कोण आहे, ते काय बोलत आहेत. त्यावर आम्ही लक्ष देत नाही." एवढेच नाही तर नितीश कुमार म्हणाले की, ते भ्रष्टाचाऱ्यांना वाचवत नाहीत. त्यापेक्षा त्यांना इकडे-तिकडे इतर राज्यांत आणण्यासाठी जे काही काम सुरू आहे, यावर मोदींनी याचा विचार करायला हवा.

दरम्यान मोदी गुरूवारी केरळ दौऱ्यावर गेले होते. यावेळी मोदी म्हणाले देशात भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात कारवाही केल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात ध्रुवीकरण होत आहे. काही राजकारणी लोक भ्रष्टाचाराच्या आरोपात आडकले आहेत. पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य आशा वेळी आले आहे की, देशात विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचारांच्या आरोपांखाली अटकेत आहेत.

अशातच मोदींनी लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांच्यावर नाव न घेता टिका केली आहे. त्यावर नितीश कुमार यांनी ही मोदींवर नाव न घेता टिकी केली आहे, ते म्हणाले केंद्रातील काही लोक काहीही बोलत असतात, त्यावर आम्ही लक्ष देत नाही.

हेही वाचा: INS विक्रांतच्या श्रेयवादावरून नव्या वादाला सुरूवात; काँग्रेस नेत्याचा मोदींवर हल्लाबोल

भ्रष्टाचारी लोकांना कोण वाचवत आहे हे देशाला महित आहे. राज्या राज्यात विरोधी सरकार मधील लोकांना भाजप मध्ये आणण्यासाठी काय काय चालू आहे. नितीश यांचा आरोप झारखंड-दिल्लीसारख्या राज्यात भाजप करत असलेल्या घोडे बाजारावर आरोपा होता. यावर आरजेडी नेता तेजस्वी यादव म्हणाले, भाजपच्या 1000 हजार पेक्षा जास्त आमदार आणि 300 पेक्षा जास्त खासदार आहेत. 8 वर्षात त्याच्यांतील एकाच्या तरी घरावर छापा पडला का ? भाजपचे नेते दुधाने धुतलेले आहेत काय. जर त्याच्या घरावर छापे पडत नसतील तर. त्यानां कोण वाचवत आहेत.

Web Title: Bihar Cm Nitish Kumar Replied Pm Narendra Modi Statement Over Corruption

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..