esakal | मंत्र्यांच्या बहिणीने घेतला दुकानदाराचा चावा!
sakal

बोलून बातमी शोधा

bihar deputy chief minister sushil kumar modis sister took the bite of a shopkeeper

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या बहिणीने रागाच्या भरात एका रेशन दुकानदाराचा चावा घेतल्याची घटना येथे घडली. प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांनी ते मिटवले. याबाबतची चर्चा राज्यात रंगली आहे.

मंत्र्यांच्या बहिणीने घेतला दुकानदाराचा चावा!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पाटना: बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या बहिणीने रागाच्या भरात एका रेशन दुकानदाराचा चावा घेतल्याची घटना येथे घडली. प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांनी ते मिटवले. याबाबतची चर्चा राज्यात रंगली आहे.

मृतदेह सायकवरून नेत असताना गाव फक्त पाहात राहिले...

रेखा मोदी असे उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीचे नाव आहे. रेखा यांनी एका स्थानिक दुकानदाराकडून दोन पोती तांदूळ खरेदी केला. तांदूळ खरेदी केल्यानंतर त्यांनी दुकानदाराला घरी आणून देण्यास सांगितले होते. पण, दुकानदाराने ठरलेल्या वेळेत तांदळाची पोती पोहचती केली नाहीत. यामुळे रेखा मोदी चिडल्या आणि दुकानदाराकडे गेल्या. दोघांमध्ये यावेळी बाचाबाची झाली. चिडलेल्या रेखा यांनी दुकानदाराच्या हाताचा चावा घेतला. यामुळे दुकानदाराने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस स्टेशनला गेल्यानंतरही रेखा यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. पोलिस स्टेशनच्या जमीनीवर झोपून त्यांनी न्याय देण्याची मागणी केली. अखेर, पोलिसांनी दुकानदाराला रेखा यांचे पैसे परत करण्याचे आदेश देत प्रकरणावर पडदा टाकला, असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

Video: पाण्यात 16 तास अडकलेल्या युवकाची हवाई दलाकडून सुटका...

दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने दुकानदाराचा चावा घेतल्याची चर्चा परिसरात रंगली. रेखा यांनी यापूर्वीही अनेकांशी भांडणे केली आहेत. रेखा मोदी यांचा आपल्या कुटुंबीयांशी काहीही संबंध नाही, असे सुशील कुमार मोदी यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे.