Video: पाण्यात 16 तास अडकलेल्या युवकाची हवाई दलाकडून सुटका... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian air force chopper rescued a man at dam in chhattisgarh video viral

एक युवक पाण्याच्या प्रवाहात 16 तास अडकला होता. अनेकांना प्रयत्न करूनही युवकाला पाण्यातून बाहेर काढता येत नव्हते. पोलिस आणि रेस्क्यू टीमला अपयश आले. अखेर भारतीय हवाई दलाने या युवकाची सुखरूप सुटका केली.

Video: पाण्यात 16 तास अडकलेल्या युवकाची हवाई दलाकडून सुटका...

बिलासपूर (छत्तीसगड): एक युवक पाण्याच्या प्रवाहात 16 तास अडकला होता. अनेकांना प्रयत्न करूनही युवकाला पाण्यातून बाहेर काढता येत नव्हते. पोलिस आणि रेस्क्यू टीमला अपयश आले. अखेर भारतीय हवाई दलाने या युवकाची सुखरूप सुटका केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मृतदेह सायकवरून नेत असताना गाव फक्त पाहात राहिले...

देशातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. यादरम्यान बिलासपूरजवळच्या खुंटाघाट धरण परिसरात एक युवक तब्बल 16 तास पाण्यात अडकला होता. पाण्याचा वेगही वाढत होता. युवक जीव मुठीत धरून बसला होता. याबाबतची माहिती रतनपूर पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने रतनपूर पोलिस आणि रेस्क्यू टीमला तरुणाला बाहेर काढण्यात अपयश आले. अखेर, याबाबतची माहिती भारतीय हवाई दलाला देण्यात आली. काही वेळातच भारतीय हवाई दलाचे हेलिकॉफ्टर घटनास्थळी दाखल झाले आणि युवकाची सुखरूप सुटका केली.

बिलासपूरचे पोलिस महानिरीक्षक दीपांशू काबरा यांनी संबंधित व्हिडिओ ट्विट केला आहे. भारतीय हवाई दलाच्या IAF MI17 हेलिकॉफ्टरने एका युवकाचा प्राण वाचवला, असे लिहून काबरा यांनी हवाईदलाचे आभार मानले आहेत.

जेसीबी चालकाचे होतेय कौतुक; व्हिडिओ पाहाच...

Web Title: Indian Air Force Chopper Rescued Man Dam Chhattisgarh Video Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaChhattisgarh
go to top