बिहारचे DGP म्हणाले, आम्ही बरोबर होतो हे सिद्ध झाले!

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 19 August 2020

 सर्वोच्च न्यायालयाचे निकालामुळे मी आनंदी आहे, आमच्या IPS आधिकऱ्याला मुंबई पोलिसांनी कैद्याप्रमाणे ठेवलं होतं. आम्ही बरोबर होतो हे न्यायालयाच्या निर्णयाने सिध्द झाले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणातील तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सूपर्द करावेत. तसेच महाराष्ट्र सरकारने तपासात सहकार्य करावे, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाकडून आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील निकाल दिल्यानंतर बिहारच्या महासंचालकांनीही प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निकालामुळे मी आनंदी आहे, आमच्या IPS आधिकऱ्याला मुंबई पोलिसांनी कैद्याप्रमाणे ठेवलं होतं. आम्ही बरोबर होतो हे न्यायालयाच्या निर्णयाने सिध्द झाले आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा आम्हाला पाठींबा आहे. अशी प्रतिक्रिया  बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी दिली आहे.  

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे : सर्वोच्च न्यायालय

सुशांत सिंह रजपूतच्या आत्महत्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने CBI ला तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याअगोदर या प्रकरणाबद्दल मुंबई पोलिस आणि बिहार पोलिस यांच्यामधे वाद झाला होता. आता या  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सर्व स्तरांवरून  प्रतिक्रिया येत आहेत. चिराग पासवान आणि अनुपम खेर यांनीही या  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर  ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar DGP Gupteshwar Pandey Recation on Supreme Courts order Sushant Singh Rajputs death investigated by CBI