esakal | भोंगळ कारभार: निधन झालेल्या शिक्षकाला केलं निलंबित 
sakal

बोलून बातमी शोधा

bihar education department suspended teacher who died two years ago

बिहारच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार अक्षरशः चव्हाट्यावर आलाय. बिहारच्या शिक्षण विभागाने नुकतीच शिक्षकांना निलंबित केल्याची एक यादी जाहीर केली.

भोंगळ कारभार: निधन झालेल्या शिक्षकाला केलं निलंबित 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पाटणा (बिहार) : बिहारमधल्या सरकारच्या कारभाराचा प्रत्यय अनेकदा आपल्याला पहायला मिळाला आहे. बिहारच्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा बिहारमध्ये होत नाहीत तर, त्या पश्चिम बंगालमध्ये होतात. यावरूनच बिहारमधल्या कारभाराची आपण कल्पनाच करू शकतो. आता तर, मृत्यू झालेल्या शिक्षकाला निलंबित करण्याचा प्रताप बिहारच्या सरकारनं केलाय. 

आणखी वाचा - शनिवारची सुटी मिळाली, पण सरकारी कर्मचारी हैराण

दिवसभरातील घडामोडी एका क्लिक वर वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बिहारच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार अक्षरशः चव्हाट्यावर आलाय. बिहारच्या शिक्षण विभागाने नुकतीच शिक्षकांना निलंबित केल्याची एक यादी जाहीर केली. धक्कादायक बाब ही की त्या यादीत, एका मृत शिक्षकाचेही नाव आहे. रणजीत कुमार यादव, असं त्या शिक्षकाचं नाव आहे. बेगुसराई जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याने ही नोटीस दिली आहे. बिहार बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा गेल्या महिन्यात झाल्या. त्यानंतर 17 फेब्रुवारीपासून शिक्षकांनी सेवेत कायम करून घेण्यासाठी बेमुदत संप सुरू केलाय. त्यामुळं बोर्डाच्या उत्तर पत्रिका तपासण्याचा प्रश्न सरकारपुढं आहे. त्यामुळंच शिक्षण विभागाने या शिक्षकांच्या निलंबनाच्या नोटीस काढण्यास सुरुवात केलीय. यात दुदैवानं रणजीत यादव यांचं नाव पुढं आलंय. 

आणखी वाचा - सुप्रिया सुळेंच्या भूमिकेमुळं राष्ट्रवादी काँग्रेसची गोची