esakal | शपथविधीवेळी नितीशकुमार यांच्याकडून मोठी चूक, पुन्हा घेतली शपथ
sakal

बोलून बातमी शोधा

nitish kumar main.jpg

जेव्हा त्यांना आपली चूक समजली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा गोपनीयतेची शपथ घेतली. 

शपथविधीवेळी नितीशकुमार यांच्याकडून मोठी चूक, पुन्हा घेतली शपथ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा- जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीशकुमार यांनी सोमवारी सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दीर्घ राजकीय अनुभव असलेल्या नितीशकुमार यांच्याकडून सोमवारी शपथ घेताना चूक झाली. नितीशकुमार जेव्हा पहिल्या पानावरील शपथ वाचून हस्ताक्षर करण्यास पोहोचले तेव्हा त्यांना आपली चूक समजली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा गोपनीयतेची शपथ घेतली. 

नितीशकुमार हे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. मुख्यमंत्रिपदाचा त्यांचा अनुभवही मोठा आहे. त्यांनी सातवेळा शपथ घेतली आहे. तरीही त्यांच्याकडून चूक कशी झाली ? असा सवाल विचारला जात आहे. जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीशकुमार सोमवारी शपथ घेताना तणावात होते. 'एनडीटीव्ही'ने हे वृत्त दिले आहे. 

हेही वाचा- Positive Story : पत्नी आणि मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्नदान; दररोज हजारो लोकांचे पोट भरणारा अवलिया

बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी सोमवारी राजभवनात आयोजित करण्यात आला होता. जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी सातव्यांदा शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 

हेही वाचा- प्लॅस्टिकपासून बनवलेलं घर तुम्ही पाहिलं का? खर्च आला फक्त साडेचार लाख रुपये

नितीशकुमार यांच्याशिवाय भाजपच्या कोट्यातून दोन उपमुख्यमंत्र्यांनी (तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी) शपथ घेतली. जेडीयूच्या कोट्यातून अशोक चौधरी, विजय चौधरी, मेवालाल चौधरी, विजेंद्रप्रसाद यादव आणि शीला मंडल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपकडून मंगल पांडे, जीवेश मिश्रा, रामप्रीत पासवान, अमेरंद्र प्रतापसिंह आणि रामसूरत राय यांनी शपथ घेतली. 

हेही वाचा- केंद्र सरकार मुलींच्या खात्यावर दर महिन्याला पाठवतंय 2500 रुपये? जाणून घ्या खरं काय

त्याचबरोबर 'हम'कडून संतोष मांझी आणि 'व्हीआयपी'कडून मुकेश मल्लाह यांनी शपथ घेतली. संतोष मांझी हे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचे पूत्र आहेत.