Bihar Election: 'राहुल गांधी भारतापेक्षा पाकिस्तानच्या टीव्हीवर जास्त दिसतात'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

राहुल गांधींची राजकीय पतच राहिलेली नाही, ते काहीही उलटसुलट बोलत आहेत. त्यांना कोणीच गांभीर्याने घेत नाही.

पाटणा Bihar Election 2020 - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडले. त्यानंतर आता राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक वाद रंगला आहे. याचदरम्यान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींना राजकीय उंची नाही आणि त्यांना कोणी गंभीरपणे घेतही नाहीत, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

यावेळी दसऱ्याच्या दिवशी रावणाऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळण्यात आले, असे राहुल गांधी यांनी वाल्मिकी नगर येथील प्रचारसभेत केले होते. त्यानंतर भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. 

हेही वाचा- #Positive Story - भीक मागणं सोडून दिव्यांग महिलेनं सुरू केला फळविक्रीचा व्यवसाय

रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, राहुल गांधींची राजकीय पतच राहिलेली नाही, ते काहीही उलटसुलट बोलत आहेत. त्यांना कोणीच गांभीर्याने घेत नाही. ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी हे बोलायला हवं होतं का ? यावरुन लक्षात येतं की काँग्रेस किती हताश आहे. जेव्हा निकाल समोर येतील, तेव्हा तुम्ही काँग्रेसची स्थिती काय होईल ते पाहा.

हेही वाचा-'अभिनंदनला सोडा नाहीतर भारत हल्ला करेल'; पाकिस्तानला होती भीती

राहुल गांधी यांनी राफेलबाबत एकदा खोटं बोलेलं आहे. जवानांचे मनोबल उद्धवस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा दाखला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान संयुक्त राष्ट्रात दिला. जर तुम्ही पाकिस्तानी टीव्ही चॅनल पाहत असाल तर तिथे राहुल गांधी सारखं दिसत आहेत. हाच त्यांचा दर्जा आहे, अशी खोचक टीका रविशंकर यांनी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar election 2020 BJP leader Ravi Shankar prasad said rahul gandhi are seen more on TV in Pakistan than India