Bihar Election : 'EVM म्हणजे 'मोदी व्होटींग मशीन'; राहुल गांधींची घणाघाती टीका

Rahul Gandhi
Rahul Gandhi

पाटना : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरु आहे. या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुंबळ जुंपली आहे.  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज बिहारमधील अरारिया येथे सभा घेऊन एनडीएवर टीका केली आहे. तसेच राहुल गांधी यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनला मोदी व्होटींग मशीन असं म्हटलं आहे. पण बिहारचे लोक यावेळी प्रचंड चिडलेले आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की भाजपा-जेडीयू युतीला ते आता हाकलून लावणार आहेत. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीकादेखील केली आहे. नितीश कुमारांनी रोजगाराचे वचन देऊन बिहारच्या लोकांना फसवलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

सीमांचल प्रदेशातील अरारियामध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर रोजगाराच्या मुद्यावरुन टीका केली आहे. बिहारच्या या निवडणुकीत रोजगार देण्याचा मुद्दा मध्यवर्ती राहीला आहे. राहुल यांनी म्हटलं की मोदी आणि नितीश कुमार या दोघांनीही गेल्या निवडणुकीत रोजगाराचे वचन दिले होते मात्र त्यांनी वचन मोडून बिहारच्या जनतेला फसवलं आहे. 

जेंव्हा समोरील गर्दीतून कुणीतरी ओरडलं की इव्हीएम? तेंव्हा राहुल गांधी म्हणाले, 'इव्हीम'? हे 'इव्हीम' नाही. हे 'एमव्हीएम आहे. त्याचा अर्थ आहे 'मोदी व्होटींग मशीन'. पण आता बिहारचा तरुण चिडलेला आहे. त्यामुळे ते इव्हीम असो व्हा एमव्हीएम... महागठबंधन हेच विजयी होणार आहे, यात शंका नाही. असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. 

यावेळी नितीश कुमार जेंव्हा सभेला संबोधित करत आहेत तेंव्हा त्यांना तरुण विचारत आहेत की आमच्या नोकऱ्या कुठे आहेत? आणि नितीश कुमार त्यांना धमकावून सांगत आहेत की आम्हाला तुमची मते नकोत. जेंव्हा ते यापद्धतीने रोजगाराच्या प्रश्नावर तरुणांना उत्तरे देत आहेत, तेंव्हा ते फक्त त्या तरुणाला नव्हे तर संपूर्ण बिहारला सांगत आहेत की मला तुमची मते नकोयत. ठिकय. त्यांना मते मिळणार नाहीत. बिहारचा तरुण त्यांना मते देणार नाहीये, असंही त्यांनी म्हटलं. 

त्यांनी म्हटलं की, महागठबंधनकडून बनणारे सरकार हे सगळ्यांचे सरकार असणार आहे. हे सरकार गरीब, शेतकरी, प्रत्येक जाती आणि धर्माचे सरकार असणार आहे. आणि आपण सगळेजण मिळून या राज्यात परिवर्तन घडवून आणणार आहोत. बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका  होत असून दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com