esakal | Bihar Election : नितीश कुमार यांच्यावरील कांदेफेक चुकीची; तेजस्वी यादवांनी केला निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

Tejswi yadav

काल एका सभेमध्ये बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर गर्दीतून कांदे फेकण्यात आले होते.

Bihar Election : नितीश कुमार यांच्यावरील कांदेफेक चुकीची; तेजस्वी यादवांनी केला निषेध

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटना : नितीश कुमारांवर काल मंगळवारी झालेल्या कांदेफेकीचा निषेध तेजस्वी यादव यांनी नोंदवला आहे. काल एका सभेमध्ये बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर गर्दीतून कांदे फेकण्यात आले होते. यावेळी नितीश कुमार यांनी सभेच्या भाषणातच कांदे फेकणाऱ्यांना उद्देशून म्हटलं होतं की, फेका... अजून फेका... त्यांना काही दिवसांनी लक्षात येईल, असं त्यांनी म्हटलं होतं. यावर आज विरोधी आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 

हेही वाचा - एकट्यानेच जंगल उभं केलं; भारतीय 'फॉरेस्ट मॅन'वर अमेरिकेच्या अभ्यासक्रमात धडा
त्यांनी म्हटलंय की, मी या घटनेचा निषेध नोंदवतो. लोकशाहीमध्ये निषेध नोंदवण्याचे इतर अनेक प्रकार आहेत. मतदानाच्या माध्यमातूनही निषेध नोंदवला जाऊ शकतो. ही घटना घडायला नको हवी होती. आम्ही मुद्यांवर लढणारे लोक आहोत यापद्धतीचे प्रकार मला आवडत नाहीत, असंही त्यांनी म्हटलंय. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाविषयी त्यांनी म्हटलं की, लोकांनी केलेल्या निश्चयावरुन दिसतंय की बिहारने ही निवडणूक बेरोजगारी आणि स्थलांतर या महत्त्वाच्याच मुद्यांवर लढवली आहे. कोरोना काळात मजूरांचे झालेले स्थलांतर या सरकारने अत्यंत चूकीच्या पद्धतीने हाताळले होते. त्यांना गुन्हेगारांसारखं वागवलं गेलं. 

सुप्रीम कोर्टाचा आदेश असूनही, बिहार सरकार ते नोकरी देणार असल्याचा दावा करत राहिले परंतु कोणालाही रोजगार मिळाला नाही. पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी कधीही दखल घेतली नाही आणि परिस्थितीचा आकलन करण्यासाठी केंद्रातील कोणतीही पथक आले नाही. माझा विश्वास आहे की तिसर्‍या टप्प्यात प्रचंड मतदान होईल. हे निश्चित आहे की नितीशकुमार आता जाणार आहेत, असंही त्यांनी म्हटलं. काल मंगळवारी नितीश कुमार मधुबनी येथील हरलाखी येथे प्रचार करत असताना त्यांच्यावर कांदे फेकण्यात आले होते. 

हेही वाचा - अर्णव अटक प्रकरण : 'हा तर लोकशाहीवरचा हल्ला'; अमित शहांनी केली आणीबाणीशी तुलना
त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याभोवतीची सुरक्षा वाढवली होती. कांदे फेकणाऱ्यांना पकडायला जाणाऱ्या सुरक्षा रक्षकांना नितीश यांनी म्हटलं की त्यांना नंतर जाणीव होईल. काल मंगळवारी बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात 53.51 टक्के इतके मतदान झाले. विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान हे 7 नोव्हेंबर रोजी होणार असून या निवडणुकीचा निकाल 10 तारखेला लागणार आहे.