लालू-राबडींचे फोटो पोस्टरवरुन 'गायब'; रविशंकर प्रसाद यांचा तेजस्वींना सवाल

lalu prasad yadav main.jpg
lalu prasad yadav main.jpg

पूर्णिया Bihar Election 2020- बिहारमध्ये निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे. नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी निवडणुकीच्या प्रचारात लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे फोटो गायब झाल्यावरुन आणि 'नवीन बिहार' च्या आश्वासनावरुन आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या आई-वडिलांच्या फोटोमुळे इतके लाजीरवाणे का आहात, असा खोचक सवाल त्यांनी तेजस्वी यांना विचारला आहे. 

पूर्णिया येथील एका प्रचारसभेत रविशंकर प्रसाद बोलत होते. ते म्हणाले की, तेजस्वी यादव यांच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री म्हणून 15 वर्षे बिहारवर राज्य केले. काही लोक म्हणत आहेत की, आम्ही नवा बिहार बनवत आहोत. परंतु, त्यांच्या नव्या बिहारच्या पोस्टरवरुन आई-वडिलांचे फोटो गायब आहेत. दोघांनी साडेसात-साडेसात वर्षे राज्य केले. तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या फोटोमुले इतके लाजीरवाणे का झाले आहात ?

लालू-राबडींचे फोटो पोस्टरवर आले असते तर लोक पूर्णियातील भट्टी बाजार परिसरात झालेल्या अपहरणाबाबत विचारतील म्हणून असे केले आहे. त्यांना कशापद्धतीने पलायन करण्यास भाग पाडले होते याच्या जुन्या आठवणी ताज्या होतील.

दरम्यान, रविशंकर प्रसाद यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याबरोबर एनडीएच्या उमेदवारासाठी सोमवारी पूर्णिया येथे प्रचारासाठी आले होते. एनडीए सत्तेत आल्यानंतर व्यापार वाढेल, असे ते म्हणाले. पण जर मतदारांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर नाही केला तर पुन्हा एकदा अपहरणाचे युग सुरु होईल, असेही त्यांनी म्हटले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com