esakal | Bihar election: जनादेश आमच्याबरोबरच, निवडणूक आयोगानं आम्हाला हरवलं- तेजस्वी यादव
sakal

बोलून बातमी शोधा

tejashwi yadav 7 main.jpg

2015 मध्येही नितीशकुमार यांनी जनादेशचा अपमान केला होता. नितीशकुमार यांना सत्ता प्रिय आहे. ते धोका देऊन खुर्ची मिळवतात.

Bihar election: जनादेश आमच्याबरोबरच, निवडणूक आयोगानं आम्हाला हरवलं- तेजस्वी यादव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा Bihar election 2020 - बिहार निवडणुकीच्या निकालानंतर तेजस्वी यादव यांची महाआघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. याचदरम्यान तेजस्वी यादव यांनी बिहारची जनता आमच्याबरोबर असल्याचे म्हटले आहे. आम्ही हरलो नाही जिंकलो आहोत. आम्ही आता धन्यवाद यात्रा काढणार आहोत. मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो. जनादेश महाआघाडीबरोबर होता. परंतु, निवडणूक आयोगाचा कल एनडीएकडे होता. ही पहिली वेळ नाही. 2015 मध्ये जेव्हा महाआघाडी होती. तेव्हाही जनादेशा आमच्याबरोबर होता. परंतु, भाजपने सत्ता मिळवण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला, असा आरोपही त्यांनी केला. 

तेजस्वी यादव म्हणाले की, 2015 मध्येही नितीशकुमार यांनी जनादेशचा अपमान केला होता. नितीशकुमार यांना सत्ता प्रिय आहे. ते धोका देऊन खुर्ची मिळवतात. जनतेने आमचा रोजगारचा मुद्दा स्वीकारला. जनतेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. एनडीएला 1 कोटी 57 लाख मते मिळाली. म्हणजेच त्यांना 37.3 टक्के मते मिळाली आहेत. परंतु, महाआघाडीला 1 कोटी 56 लाख 888 हजार 458 मते मिळाली आहेत. महाआघाडीला 37.2 टक्के मते मिळाली आहेत. एनडीए आणि महाआघाडीदरम्यान 12 हजार मतांचे अंतर आहे. 

हेही वाचा- उमा भारतींना तेजस्वीचं कौतुक; म्हणाल्या, तो राज्याचे नेतृत्व करु शकतो, पण...

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर तेजस्वी यादव म्हणाले की, जर एनडीए सरकारने आपल्या आश्वासनाप्रमाणे काम केले नाहीतर आम्ही आंदोलन करु. सरकारने 19 लाख नोकरी निर्माण केले नाहीत, बिहारच्या जनतेला औषधे, सिंचन योजना, शिक्षण दिले नाही तर महाआघाडीकडून मोठे आंदोलन केले जाईल. 

हेही वाचा- बापरे! नदीकाठावर भांडी घासणाऱ्या मुलीचा मगरीच्या झडपेत जागीच मृत्यू

तेजस्वी यांनी पुन्हा एकदा मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करताना 10 जागांवर घोटाळा झाल्याचे म्हटले. टपाल मतांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला.