esakal | उमा भारतींना तेजस्वीचं कौतुक; म्हणाल्या, तो राज्याचे नेतृत्व करु शकतो, पण...
sakal

बोलून बातमी शोधा

uma bharati

उमा भारती यांनी कमलनाथ यांच्याविषयीही प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, कमलनाथ यांनी निवडणूक चांगल्याप्रकारे लढवली आहे.

उमा भारतींना तेजस्वीचं कौतुक; म्हणाल्या, तो राज्याचे नेतृत्व करु शकतो, पण...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या उमा भारती यांनी बिहार विधानसभेतील निकालाविषयी भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी मध्य प्रदेशात पार पडलेल्या पोटनिवडणुकीबाबतही आपलं मत मांडलं आहे. बिहारच्या अटीतटीच्या सामन्याबाबत बोलताना त्यांनी महागठबंधनचे नेते तेजस्वी यादव यांच्याविषयी चांगले उद्गार काढले आहेत.

हेही वाचा - 50 शिरच्छेद, मृतदेहांचे तुकडे, गाव भस्मसात, महिलांवर लैंगिक अत्याचार; ISIS चा अमानुष हल्ला

त्यांनी म्हटलंय की, तेजस्वी हा चांगला मुलगा आहे. तसेच ते बिहार चालवू शकतात मात्र, थोडं मोठं झाल्यावर असं त्यांनी म्हटलंय. उमा भारती यांनी पुढे म्हटलंय की, तेजस्वी यादव यांच्याकडे राज्य चालवण्याचा कसलाच अनुभव नाहीये. त्यामुळे ते आता राज्य चालवण्यास सक्षम नसल्याचं त्यांनी म्हटलंय. थोडं मोठं झाल्यावर ते हे काम करु शकतील, असं त्यांनी म्हटलंय. यासोबतच त्यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेल्या कमलनाथ यांचीदेखील स्तुती केली आहे. 

उमा भारती यांनी बुधवारी भोपाळमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ही वक्तव्ये केली आहेत. यावेळी त्यांनी बिहारच्या निकालावर आपलं मत मांडलं आहे. त्यांनी म्हटलंय की, तेजस्वी यादव हे एक चांगेल व्यक्ती आहेतच. परंतु, सध्यपरिस्थितीचा विचार करता ते बिहारचे राज्य चालवण्याास असक्षम आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या लालू प्रसाद यादवांनी हे राज्य पुन्हा एकदा जंगलराजमध्ये ढकललं असतं. मात्र, तेजस्वी हे राज्याचे नेतृत्व करु शकतील पण थोडं मोठं झाल्यावर असं त्यांनी म्हटलंय. 

हेही वाचा - गीरमध्ये मगरीची झडप; नदीकाठावर भांडी घासणाऱ्या मुलीचा वेदनादायी मृत्यू

पुढे त्यांनी कमलनाथ यांच्याविषयीही प्रतिक्रिया दिली आहे. बोलताना त्यांनी म्हटलंय की, कमलनाथ यांनी निवडणूक चांगल्याप्रकारे लढवली आहे. परंतु त्यांनी जर आपलं सरकारच योग्यरितीने चालवले असते तर त्यांना याठिकाणी एवढ्या समस्या निर्माण झाल्या नसत्या. ते निश्चितच चांगले व्यक्ती आहेत. आणि ते माझ्या मोठ्या भावाप्रमाणे देखील आहेत. तसेच त्यांनी ही निवडणूक अत्यंच चतुराईने लढली असंही त्यांनी म्हटलं आहे.