

बिहार निवडणुकीत एनडीए आणि विरोधकांमध्ये चुरस वाढली आहे. दरम्यान बिहारमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शुक्रवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. एनडीएने या जाहीरनाम्याला "संकल्प पत्र" असे नाव दिले आहे. एनडीएने आपल्या जाहीरनाम्यात राज्यातील प्रत्येक तरुणाला नोकरी आणि रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे आणि महिला उद्योजकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.एनडीएच्या जाहीरनाम्यात रोजगार, विकास, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित २५ प्रमुख आश्वासने समाविष्ट आहेत.