Bihar Election NDA Seat Sharing : बिहार निवडणुकीसाठी 'NDA'चा जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला? ; लवकरच होणार अधिकृत घोषणा!

Bihar Election 2025 NDA updates : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून (१० ऑक्टोबर) पासून सुरू झाली आहे.
Nitish Kumar and Modi
Nitish Kumar and Modielection
Updated on

NDA finalizes seat-sharing formula ahead of Bihar Election 2025: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालाचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या सर्व तारखा जाहीर केल्यापासून, प्रत्येक राजकीय पक्ष आणि आघाड्या उमेदवारी याद्या आणि जागा वाटप अंतिम करण्याच्या गडबडीत आहेत. दरम्यान, काही पक्षांनी त्यांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे, तर सत्ताधारी एनडीए आणि विरोधातील इंडिया आघाडीकडून अद्यापपर्यंत जागा वाटप जाहीर झालेलं नाही.

दरम्यान, आता सूत्रांच्या हवाल्याने एक मोठी अपेडट समोर आली असून, एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला निश्चित झाला असून, लवकरच याची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार एनडीए आघाडीत नितीश कुमार यांचा जदयू पक्षाला सर्वाधिक १०२ जागा मिळाल्या आहेत व भाजपकडे १०१ जागा आल्या आहेत.

याशिवाय एनडीए आघाडीतील चिराग पासवान यांच्या एलजेपी पक्षाला २५ जागा मिळणार आहेत. तर बिहारमधील एनडीए आघाडीतील अन्य मित्र पक्षांमधील केंद्रीयमंत्री जीतनराम मांझी यांच्या एचएएम पक्षाला आठ जागा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएम पक्षाला सात जागा दिल्या जाणार आहेत. जागा वाटपाचे हे सूत्र जवळपास अंतिम असून, एखादी जागा कमी जास्त होवू शकते, अशी माहिती समोर आलेली आहे.

Nitish Kumar and Modi
Tejashwi Yadav Vs Nitish Kumar: बिहार विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमारांना तेजस्वी यादव यांनी दिला झटका!

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून (१० ऑक्टोबर) पासून सुरू झाली आहे. २० ऑक्टोबर ही माघार घेण्याची शेवटची तारीख आहे. तर अधिसूचनेनुसार, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवार १७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करू शकतात, ज्याची छाननी दुसऱ्या दिवशी होणार आहे.

Nitish Kumar and Modi
Hemant Soren on Bihar Election : हेमंत सोरेन यांनी वाढवलं RJDचं टेन्शन? बिहार निवडणुकीसाठी केली ‘ही’ मोठी मागणी!

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी आहे. पहिल्या टप्प्यात १२१ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक आयोग यासाठी तयारी अंतिम करत आहे. तर राज्यात दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबर रोजी आहे. दुसऱ्या टप्प्यात १२२ विधानसभा जागांवर मतदान होईल आणि १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com